पुणे
Trending
मुळशीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुभाष माझिरे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुभाष नामदेव माझिरे यांची निवड करण्यात आली. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
यावेळी जेष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे, राजाभाऊ हगवणें,सविता दगडे, नामदेव माझिरे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सभापती कोमल वाशीवले, राधीका कोंढरे, तालुका युवकाध्यक्ष निलेश पाडाळे, तसेच विवीध सेलचे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षात युवकांचे संघटन वाढवुन लोकहिताची अधीकाधीक कामे करणार असल्याचे यावेळी माझिरे यांनी सांगीतले.
पै. सुभाष नामदेवराव माझिरे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री साई मंदिर भुकूम यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान करताना साईभक्त हभप श्री.रोहिदास आबू माझिरे, किर्तनकार हभप श्री.दशरथ महाराज वहाळे, हभप श्री.अनिल महाराज शेडगे, हभप श्री.नवनाथ महाराज कुडले, हभप श्री.राम महाराज गायकवाड उपस्थित होते
पै.श्री.सुभाष नामदेवराव माझिरे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यावेळी सन्मान करताना पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य, भुकूम गाव तंटामुक्ती समितीचे मा.अध्यक्ष, वस्ताद श्री.शरद पवार मा.उपसरपंच
श्री.ज्ञानेश्वर आंग्रे, युवा उद्योजक बांधकाम व्यावसायिक श्री.राजेंद्र महाराज आंग्रे, मा.आदर्श सरपंच श्री.नामदेव आण्णा माझिरे
मा.सरपंच भुकूम गाव तंटामुक्ती समितीचे मा.अध्यक्ष श्री.बाळासाहेब हगवणे, राष्ट्रीय पंच श्री.रोहिदास आप्पा आमले, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री.निलेश ननावरे, युवा नेते उद्योजक श्री.अमरदादा माझिरे, श्री.सचिन सटाले, श्री.प्रविण हगवणे, यांनी सन्मानित केलं.
Share