राजकीय
Trending

भुकुम गावात रेखा वाघ सरपंच तर सचिन आंग्रे उपसरपंचपदी बिनविरोध

भुकूम  येथे रेखा योगेश वाघ सरपंच तर सचिन पोपटराव आंग्रे उपसरपंचपदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उज्ज्वला पवार ,भागवत यादव ,शरद बेलदार यांनी काम पाहिले. सरपंच उपसरपंच पदासाठी वाघ आणि आंग्रे यांचे दोनच अर्ज आल्यामुळे वेळेचा नियम पाळून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठीक दोन वाजता निकाल जाहीर केला.
भुकूम गावाचा कायापालट करणार ः सचिन आंग्रे
पुण्याजवळील आमचे भुकूम गावाचा वेगाने विकास होत आहे. आता नवी ग्रामपंचायत भुकूम गावचा कायापालट करेल असा विश्वास नवनिर्विचीत उपसरपंच सचिन आंग्रे यांनी महावार्ताशी बोलताना व्यक्त केला.
गावात वेगाने नागरीकरण होत आल्याने गावची लोकसंख्या वाढत आहे. यासाठी सर्व सुविधा सर्व नागरिकांना देण्यासाठी सरंपच व सर्व सदस्य कटिबध्द आहोत असेही आंग्रे यांनी सांगितले.
अंकुश प्रकाश खाटपे,सुवर्णा सुभाष पानसरे,गौरी प्रसाद भरतवंश, सचिन बाळासाहेब हगवणे, निलेश जयसिंगराव ननवरे, सुवर्णा रामदास आंग्रे,मयुरी अभिलाष आमले  या नव्या सदस्यांसह माऊली आंग्रे, रामदास आंग्रे, महाराज आंग्रे, भरत माझिरे, रोहिदास आमले, दिलीप चोरगे, कालीदास गुजर, बालकृष्ण आंग्रे, विकास आंग्रे, तुषार माझिरे यांनही नव्या सरपंच व उपसरपंच यांना पुष्पगुच्छ देऊन  नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. यावेळी पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस हवालदार नितीन गार्डी आणि गणेश साळुंके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close