पुणे
Trending

हिंजवडीत सरपंचपदी गणेश जांभुळकरांचा 15-2 मतांनी दणदणीत विजय

उपसरपंच मनिषा हुलावळे यांचा विजय

महावार्ता न्यूज ः मुळशीतील श्रीमंत ग्रामपंचायतीवर अखेर परिवर्तन घडून आले असून म्हातोबा पॅनेलचे गणेश जांभुळकर सरपंचपदी तर मनिषा हुलावळे यांची उपसरपंचपदी एकतर्फी निवड करण्यात आली. 15 विरूध्द 2 मतांनी जांभुळकर व हुलावळे यांनी हिंजवडीच्या सरपंच, उपसरपंच पदाचा गड सहज ेसर केला.
हिंजवडी ग्राामपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत केवळ 2 सदस्य विरूध्द असतानाही निवडणुकीचा घाट घालण्यात आला. अखेर एकजूट असणार्‍या म्हातोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे गणेश बन्सीलाल जांभुळकर यांनी मयूर साखरे यांचा तर मनिषा जयसिंग हुलावळे यांनी आरती बेंद्रे यांचा 15 विरूध्द 2 मतांनी पराभव करून दणदणीत विजय मिळविला. निवडणुक निर्णय अधिकारी राजकुमार डोंगरे यांनी निकाल जाहिर करताच हिंजवडीत जल्लोष साजरा करण्यात आला. निवडणुकीसाठी ग्रामसेवक टि. व्ही. रायकर यांनीही काम पाहिले. निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी साडेदहा वाजता हिंजवडी ग्रामपंचायीतच्या सरंपच, उपसरपंच निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी 3 अर्ज दाखल झाले होते. सरपंच पदासाठी गणेश जांभुळकर, शिवनाथ जांभुळकर आणि मयूर जांभुळकर यांनी अर्ज भरला होता. तर उपसरपंच पदासाठी मनिषा हुलावळे, आरती बेंद्रे आणि रेखा साखरे यांनी अर्ज भरला होता. शिवनाथ जांभुळकर व रेखा साखरे यांनी माघार घेतल्याने गणेश जांभुळकर विरूध्द मयूर साखरे आणि मनिषा हुलावळे विरूध्द आरती बेंद्रे अशी सरळ एकतर्फी लढत झाली.
चिठ्ठीव्दारे मतदान झाल्यानंतर 15 विरूध्द 2 मतांनी जांभुळकर व हुलावळे यांनी दणदणीत विजय सांदन केला. सरपंच गणेश जांभुळकर यांच्यासाठी विक्रम वसंत साखरे हे सूचक होते.
ग्रामदैवत श्री म्हातोबा परिवर्तन पॅनेलचे सदस्य शिवानी अभिषेक जांभुळकर सौ. रेखा संदिप साखरे, सचिन जांभुळकर, विशाल साखरे, पल्लवी गंगावणे, प्रतिक्षा घोटकुले, दिपाली शरद जांभुळकर, विक्रम वसंत साखरे,अ‍ॅड. प्रदिप वाघमारे, शुभांगी साखरे, ऐश्वर्या वाघमारे, शिवनाथ जांभुळकर, मच्छिंद्र हुलावळे यांनी नव्या सरपंच व उपसरंच पदासाठी मतदानकरून एकजूटीचे दर्शन घडवले.
निकाल जाहिर होताच हिंजवडीत म्हातोबा चांगळलंचा जयघोष करण्यात आला. यावेळी  केंद्रिय पद भूषवलेले शांताराम जांभुळकर, माजी जि. प सदस्या स्वाती हुलाावळे,संतोष साखरे, माजी उपसरपंच मल्हारी साखरे, तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, सुरेश हुलावळे, प्रदिप साखरे, सूर्यकांत साखरे, कुंडलिक जांभुळकर, अॅड. शिवाजी जांभुळकर, संदिप साखरे, अरूण साखरेसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close