देशविदेश
Trending
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुळशीच्या पेरिविंकल शाळेला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ‘किताब
सतरा देशातील विद्यार्थ्यांचा होता सहभाग, सुस शाखेतून आयुश संतोष भूजबळ, आदर्श बजरंग भांडे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

महावार्ता न्यूज ः उत्कर्ष क्रिएशन्स तर्फे ऑनलाईन आंतरराष्ट्रीय अबॕकस परीक्षेमध्ये चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलच्या सुस शाखेतून आयुश संतोष भूजबळ याने ग्रुप ए मधून आणि आदर्श बजरंग भांडे याने ग्रुप सी मधून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ‘किताब मिळवत यश संपादक केले आहे.
ही परीक्षा जानेवारी च्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात आली होती.तेव्हा या स्पर्धेमध्ये १७ देशांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.या स्पर्धेत दिलेल्या वेळेत म्हणजे एक मिनिटामध्ये अबॅकस पद्धतीने गणित सोडवणे व दिलेले गणित हे कमीतकमी वेळात अबॅकस पद्धतीनेच सोडवणे असे याचे स्वरूप होते.या सह स्पर्धेचे सर्व निकष पार करून पेरिविंकल स्कूलच्या आयुष भुजबळ व आदर्श भांडे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या विद्यार्थ्यांना पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल व संस्थेच्या संचालिका रेखा बांदल यांचे हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे.या परीक्षेसाठी अबॅकस शिक्षिका संध्या शिंदे,सुस शाखेच्या समन्वयिका निर्मल पंडित,शिल्पा क्षीरसागर,शिल्पा थुल यांनी योग्य मार्गदर्शन केले याच बरोबर विद्यार्थ्यांची मेहनत,चिकाटी या सर्वांचे फळ म्हणून हे यश संपादन केले
Share