जांबे गावातील बोगस मतदारांशी लढा देत जिंकले वॉर्ड 3 चे उमदेवार, विजयोत्सव कोकणात साजरा

मुळशी येथील जांबे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची तालुक्याचं लक्ष्य वेधणरी निवडणूक होती कारण म्हणजे वॉर्ड क्रमांक ३ मध्ये अनेक नवीन मतदारांची नावे जी लोकं गावामध्ये कधी राहायला नव्हती काहींना जांबे गाव पण माहीत नाही असे बोगस नावे लावण्यात आली होती अनेक शासनकडे पाठपुरावा करून सुद्धा नावे कमी झाली नाही तरीही गाव करेल ते राव करू शकत नाही ह्या म्हणी प्रमाणे स्थानिक मतदारांनी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई म्हणून प्रत्येक स्वतः उमेदवार असल्यासारखे साथ देत होते ही निवडणूक फक्त उमेदवारांची न राहता स्थानिक जनतेनी हातात घेतली होती
वॉर्ड क्रमांक ३ मधून
१) ओबीसी पुरुष उमेदवार म्हणून जांबे गावतील शेतकरी कुटुंबातील तरुण तडफदार उमेदवार श्री राजेंद्र किसन माळी
२) सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी जांबे गावचे प्रसिद्ध असणारे निवेदक व लोकप्रिय उमेदवार अंकुश बाळू गायकवाड
३) सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी देशाची सेवा करणारे माजी सैनिक कै. भरत सर्जेराव शितोळे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असणारे वैभव भरत शितोळे यांची आई श्रीमती शोभा भरत शितोळे असे उमेदवार गावामध्ये सामाजिक उपक्रम , आरोग्य शिबीर , धार्मिक कार्यक्रम , अश्या विविध शेत्रात चांगले काम केल्या मुळे परिचित असणारे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले. हा विजय एेतिहासिक असा होता कारण बोगस मतदार व अनेक वर्षांपासून सत्तेत असणारा विरोधी पॅनल असा संघर्ष असला तरी परिवर्तन हे घडणार हे स्थानिक मतदारांनी ठरवल होत
कारोनामुळे शासनाच्या नियमानुसार विजयी मिरवणूक काढता आली नाही व लोकांना आनंदोत्सोव साजरा करता आला नाही यामुळे नागरिकांनी विजयी आनंदोत्सोव कोंकण मध्ये निसर्गामध्ये व समुद्र किनाऱ्यावर जाऊन साजरा केला.
उमेदवार हे चांगल्या स्वभावाचे व लोकांसाठी काही तरी करण्याची तळमळ असल्यामुळे नक्कीच चांगले काम करतील आम्ही सर्व जण ज्यांच्यामुळे हे शक्य झाले असे स्थानिक मतदार बंधू भगिनींचे ऋणी राहू आपले उमेदवार एक चांगले काम करून दाखवतील व आपल्यासाठी कायम उभे राहतील व आपल्या गावाचा चांगला विकास सगळ्यांना सोबत घेऊन करतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते वैभव भरत शितोळे यांनी नागरिकांना दिला