क्राइम
Trending

मुळशीतून गज्या मारणे प्रकरणी 8 गाड्या जप्त, गाडी मालकांना अटकेची शक्यता

महावार्ता न्यूज ः गुंड गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरुड) यांच्या सुटकेनंतरच्या मिरवणूकीतील 27 गाड्यांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यात मुळशीतून 8 गाड्या जप्त करण्यात आल्या असून गाडीच्या मालकांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
17 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजून 50 ते 9 वाजून 20 मिनिटे या काळात बंगलुरु – मुंबई हायवे रोडने तळोजा कारागृहातून सुटलेला गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरुड) हा त्याच्या पांढर्‍या रंगाच्या गाडीमधून प्रवास करुन त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढली होती. या सीसीटीव्हीवर 30 गाड्या सापडल्या असून यापैकी 27 गाड्यांचा तपशील पोलिसांच्या हाती आला आहे. यात मुळशीतील पूर्व भागातील 8 गाड्या गुरूवारी जप्त करण्यात आल्या असून गाडी मालकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेगार गजानन मारणेच्या गाडीच्या आजू बाजूला सुमारे 100 ते 150 समर्थकासह 30 ते 35 चारचाकी गाड्या चालवून गाड्यांचे बाहेर प्लॅटफार्मवर धोकादायक पद्धतीने उभा राहून, गाड्यांमधून अर्धवट शरीर बाहेर काढून, रस्त्याच्या कडेला होऊन गाड्या थांबवून सार्वजनिक रस्त्याने मुंबईकडून बंगलुरुकडे जाणार्‍या वाहनचालकांना त्यांचा हक्क असताना त्यापासून वंचित ठेवणे, दहशतीच्या जोरावर घोषणाबाजी करुन इतर वाहनचालकांना पुढे जाऊ न देणे, वाहनचालकांना शिवीगाळ करुन दहशत निर्माण करणे, वाहनचालकांना थांबवण्याचा इशारा केला असता न थांबता निघून जाणे या आरोपाचाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंड गज्या मारणे या प्रकरणात हिंजवडीसह 4 पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्हाच्या तपासाचा भाग म्हणून गुन्हात समाविष्ठ असलेल्या गाड्या जप्त करण्यात येत आहे. गाड्या जप्त करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे.

अनेक गाडी मालक अडचणीत
एक दिवस वापरासाठी आपल्या मित्राला, ओळखीच्या माणसाला अनेकांनी गाड्या दिल्या होत्या. या गाडया थेट तळोजा कारागृहाबाहेर जातील आणि गज्या मारणेंला समर्थन करतील असे मूळ गाडी मालकांना कल्पनाही नव्हती. मात्र पोलिसांच्या तपासात या गाड्या सापडल्याने अनेक जागा मालक दोस्तीत गाडी देऊन अडचणीत सापडले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close