
महावार्ता न्यूज ः विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मुळशी प्रखंडची बैठक संपन्न शिवकालीन तुळजा भवानीमाता मंदीर पिरंगुट येथे पार पडली .
मुळशी तालुक्याचे विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री रोहन निकटे ,सदानंद मारणे, मुळशी तालुक्याच्या प्रखंड सहमंत्री पूजाताई खोल्लम विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी मुळशी प्रखंड संयोजिका यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी परिचय व कार्यपद्धती,विश्व हिंदू परिषद स्थापना, दुर्गा वाहिनी स्थापना हेतू , स्त्री सक्षमीकरण, लव्ह जिहाद याबाबत विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गावाहिनी संयोजिका अॅड.मृणालिनी पडवळ यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस तालुक्यातील विविध गावातील दुर्गा उपस्थित होत्या.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मातृशक्ती पालक आप्पा कुलकर्णी,विश्व हिंदू परिषद संयुक्त जिल्हा सहकार्याध्यक्ष (पुणे, भिमाशंकर)धनाजी मामा शिंदे,पिंपरी चिंचवड जिल्हा मंत्री संजय शेळके ,मातृशक्ती विभाग संयोजिका भक्तीताई साळवी , दुर्गा वाहिनी पिंपरी चिंचवड जिल्हा संयोजिका अर्पिता फाकटकर ,स्वातीताई गुरव ,उल्का बेल्हेकर, संगमनेर , प्रखंड सहसंयोजिका हे सर्व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
Share