पुणे
Trending

सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गायकवाड यांचे निधन

पुणे ः श्री क्षेत्र महांळुगे नगरीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व श्री समर्थ सदगुरू श्रीपती बाबा महाराजांचे निस्सिम भक्त प्रभाकर गणपत गायकवाड (वय 77),रा. गोखले नगर यांचे हद्यविकारानेे निधन झाले. त्यांच्या पश्चात मागे पत्नी, 2 मुले, नातवंडे असा परिवार आहे. पुणे वेधशाळेतून निवृत्त झाल्यानंतर अनेक सामाजिक कार्यात त्यांचे योगदान होते. सदगुरू श्रीपती बाबा महाराज यांच्या चरित्रलेखनाचे काम त्यांनी केले होते. पर्यावरण, शैक्षणिक सामाजिक संस्थेत कार्यरत असणारे प्रशांत गायकवाड व प्रविण गायकवाड यांचे ते वडिल होते.
दशक्रिया विधी
स्वर्गिय प्रभाकर गणपत गायकवाड यांचा दशक्रिया विधी 26 फेब्रुवारी 2021 रोजी वैकुंठ स्मशान भूमी, नवी पेठ येथे सकाळी 9 वाजता होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close