
महावार्ता न्यूज: पुणे जिल्हा परिषदेच्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराने मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुळशीतील एकूण ९५ ग्रामपंचायतींमधून 2018-19 वर्षाचा ‘सुंदर गाव पुरस्कार’ भुकूम गावास मिळाला आहे. दिवंगत मंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. दहा लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांनी गावस्तरावर राबविलेल्या विविध शासकीय योजना, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण, कचरा, सांडपाणी, आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामागिरी मुळे सन २०१८-२०१९ साठीचा सुंदर गाव पुरस्कार भुकूम गावाला भेटला आहे.सरपंच सौ रेखा योगेश वाघ, माजी सरपंच नितीन बाळासाहेब कुढले, ग्रामसेवक भागवत यादव यांनी हा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्विकारला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, आमदार सुनिल शेळके व विविध मान्यवर उपस्थित होते.
Share