महाराष्ट्र
Trending

हिंजवडीत रॉयल बुलेट ग्रुप तर्फे पिंपरी चिंचवड मधील सर्वांत मोठी शिवजयंती साजरी

ऐतिहासिक अशी १११ फूट भगवा ध्वज पदयात्रा, २१ फूटी, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

पिंपरी चिंचवड मधील सगळ्यात मोठी शिवजयंती चा मान रॉयल बुलेट ग्रुप-पुणे जिल्हा या शिवजयंती उत्सव समितीने पटकाविला.कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे नियम व सरकारी आदेशाचे पालन करत आयोजन समितीने अत्यंत शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने मिरवणूकीचे आयोजन केले.
अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व प्रतिमेचे पूजन करून पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. महाराजांच्या पालखीच्या पुढे टाळ,मृदुंग आणि राम कृष्ण हरी अशा हरिनामाने वारकर्‍यांनी गजर केला.त्याच प्रमाणे ढोल ताशा पथकाने आपल्या आवाजाने शिवभक्तांची व हिंजवडी आयटी नगरीतील नागरिकांची मने जिंकून घेतली. रॉयल बुलेट ग्रुप तर्फे मिरवणुकीमध्ये प्रथमच पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या जगावर पुन्हा एकदा छत्रपतीशासन यावे महिलांना समानतेचे हक्क आणि सुरक्षिततेचे स्वातंत्र्य मिळावे, एकट्या, अबला स्त्रियांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, अशा आगळ्यावेगळ्या पथनाट्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

यावर्षी रॉयल बुलेट ग्रुप तर्फे ऐतिहासिक अशी १११ फूट भगवा ध्वज पदयात्रा काढण्यात आली.
सदर मिरवणूक हिंजवडी गावचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिरापासून सुरू करून द्रौपदा लाँस पर्यंत घेण्यात आली. द्रौपदा लाँस मध्ये महाराजांची पालखी आल्यानंतर २१ फूटी, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शिववंदना घेऊन कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित असणार्‍या शिवकन्या आणि महिलांच्या हस्ते महाराजांची आरती घेण्यात आली.
शिवजयंती च्या या शुभ दिनानिमित्त महाराजांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याच प्रमाणे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचे आकर्षण असा लेझर-शो घेण्यात आला. रॉयल बुलेट ग्रुप पुणे जिल्हा यांच्या कडून कोरोना योद्धेयांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व आयोजकांचे, सहकारी मित्र परिवाराचे, ग्रामस्थांचे, पोलिस प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close