महाराष्ट्र
Trending

पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ यांचा विशेष पुरस्काराने नाथाजी राऊतांकडून गौरव

ऑनलाइन वकृत्व स्पर्धा मध्ये  ३०० हून अधिक जणांनी सहभाग

महावार्ता न्यूज  :  येथील सहकार महर्षी कै.चंद्रकांत शंकर राऊत यांची दुसरी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सी एस आर सोशल फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, विशेष पुरस्कार वितरण, राम मंदिरास निधी समर्पण, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकार्यांचा सत्कार आदी कार्यक्रम पार पडले. सी एस आर विशेष पुरस्काराने पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ यांना उद्योजक नाथाजी राऊत यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

        यावेळी महादेव कोंढरे, सविता दगडे, सुनिल चांदेरे, आत्माराम कलाटे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, रविंद्र कंधारे, विजय केदारी, प्रकाश भेगडे, स्वाती ढमाले, भानुदास पानसरे, गंगाराम मातेरे, दादाराम भांडेकर, सुहास भोते, दगडूकाका करंजावणे, शिवाजी तांगडे, सरपंच निलेश गावडे, सुखदेव तापकीर, शरद केदारी, सुनिल कळमकर आणि लवळे ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सी एस आर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश राऊत, आतिश भूमकर, उपसरपंच रंजित राऊत, शुभम राऊत यांनी केले होते.

        सी एस आर सोशल फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.विजय हिरामण सातव यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान कले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच अयोध्या या ठिकाणी होत असलेल्या राम मंदीरासाठी फाऊंडेशनतर्फे निधी देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सातव आणि भाऊ केदारी यांनी केले, प्रस्तावना ऋषीकेश चंद्रकांत राऊत यांनी केली, आभार प्रदर्शन रंजित राऊत, प्रमोद राऊत आणि शुभम राऊत यांनी केलं.

        ऑनलाइन वकृत्व स्पर्धा मध्ये  ३०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला होता त्याच्या बक्षीस वितरण समारंभ मुळशी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते यांच्या हस्ते करण्यात आला.

CSR Social Foundation आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे विजेते

 शिशु गट

१. धीरज झीरपे (सुस)

२. ओवी मारणे (पिरंगुट)

३. श्रेयश प्रकाश राऊत (लवळे)

 बाल गट

१.  तृप्ती अशोक थिटमे (मोशी)

२.  स्वराली अमित कोरे (पिरंगुट)

३.  श्रावणी देवकर (हिंजवडी)

 युवक गट

१. रोहन अशोक थिटमे (मोशी)

२. साक्षी संपत कुदळे (लवळे)

३. साक्षी रविंद्र सातव (लवळे)

 खुला गट

१. अंजली केदारी (लवळे)

२. वैभवी काळभोर (लोणी काळभोर)

३. ऋतुजा चव्हाण (शिक्रापूर) 

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close