
महावार्ता न्यूज ः हिंजवडी पोलीस ठाणे आवारातील वर्षानुवर्षे धुळखात पडलेली बेवारस व विविध गुन्ह्यातील जप्त वाहने ३ वसात १७५ वाहनाचे मुळ मालकाचा शोध मावळ तालुक्यातील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलीसांनी लावला आहे.
बेवारस वाहने मुळ मालकांना परत देण्याचे आदेश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मा. पोलीस आयुक्त साो,पिंपरी-चिचवड यांनी दिले होते. त्या अनुशंगाने आयुक्तालयातील चिंचवड पोलीस स्टेशन, भोसरी पोलीस स्टेशन नंतर हिंजवडी पोलीस स्टेशनचे आवारातील अनेक वर्षे धुळखात पडलेल्या वाहनाचे चासी नंबर व इंजिन नंबर वरुन मुळ मालकाचा शोध घेवुन लावला आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे , सहा.पोलीस आयुक्त गणेश बिराजदार साो, , वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशन आवारात मालकाच्या प्रतिक्षेत अनेक वर्षापासुन बेवारस व विविध गुन्ह्यात जप्त असलेल्या १७५ वाहनाच्या मुळ मालकाचा शोध घेण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सांवत सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड व मुद्देमाल कारकुन सहा.पोलीस फौज.साबळे, मुद्देमाल मदतनीस पोलीस नाईक १५४१ साबळे व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे भारत वाघ व शिवाजी जव्हेरी यांना यश आले आहे. सदर शोध लागलेल्या वाहनांचे मालकांनी आपली वाहने ओळख पटवुन व पुरावे देवुन परत घेवुन जाण्या बाबत आव्हान पोलीसांनी केले आहे.हिंजवडी पोलीस स्टेशन आवारात ४०० हुन अधिक वाहने पडुन आहेत. त्यापैकी १७५ वाहन मालकाचा शोध लागला असुन बाकी वाहन मालकाचा शोध लावण्याचा तपास चालु आहे. तरी वाहनवाहनाचा प्रकार,चासी नंबर, इंजिन नंबर वाहन मालकाचे नाव पत्ता यांची यादी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली आहे. सदर यादीमध्ये आपले वाहन / नाव असल्यास अशा मालकांनी ओळख पटवुन, आपले वाहने घेवुन जावी.
पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकियेमुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळुन येत नसल्याने सदर वाहने पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे मालकाच्या प्रतिक्षेत धुळखात पडुन आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसर बक्काल व विचित्र दिसुन येतो.त्यामुळे पोलीस ठाणे सुशोभिकरणास बाधा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवुन हिंजवडी पोलीस स्टेशनने बेवारस वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला.
गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने सदर शोध लागलेल्या एकुण १७५ मालकांशी संपर्क साधला जाणार आहे. शोध लागलेल्या वाहनांचे मालकांनी त्याची वाहने तात्काळ हिंजवडी पोलीस स्टेशन येथुन वाहनाची कागदपत्रे, स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र दाखवुन घेवुन जावीत. सदरची वाहने १५ दिवसात घेवुन न गेल्यास, ती बेवारस समजुन, कायदेशीर प्रकिया पुर्ण करुन सदर वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येईल असे हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.
Share