पुणे
Trending
मुळशीतील पत्रकारांचा पिरंगुट ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने गौरव
तहसीलदार, गटविकास अधिकसार्यांनी मानले यंत्रणेचे आभार

कोरोना काळात वृत्तसेवा देण्यापासून ते रूग्णांचा मदत करण्यात आघाडीवर असणारे धडाडीचे पत्रकार संजय दुधाणे, धोंडिबा कुंभार, विनोद माझिरे, प्रदीप पाटील, कालिदास नगरे, प्रविण सातव यांच्यासह तहसील, ग्रामपंचायत, आरेाग्य प्रशासनाचा पिरंगुट ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून विशेष गौरव करण्यात आला.
सन्मान कोविड योद्धांचा ग्रामपंचायत पिरंगुटच्या वतीने कोविड योद्धां तसेच शिष्यवृत्ती पात्र विध्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य शिक्षक यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी कोविड योद्धा म्हणून मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण साहेब, गट विकास अधिकारी मा. संदीप जठार , तालुका आरोग्य अधिकारी मा. करंजकर यांना तसेच डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ऍम्ब्युलन्स ड्राईवर, ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळा सर्व शिक्षक / शिक्षिका व पत्रकार बंधू यांना तसेच महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, ग्रामविकास प्रशासन आणि वीज वितरण विभागातील सर्व सन्माननीय अधिकारी व कर्मचारी यांना विशेष कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले .

गेल्या वर्षभरापासुन कोरोना विषाणू महामारीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता परिसरातील व तालुक्यातील आपल्या सर्वांच्या कुटुंबांची काळजी घेत या सर्वच प्रशासनाने विशेष काम केले. तालुक्यातील तसेच आपल्या गावातील या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता या सर्वांनीच सर्वतोपरी अहोरात्र प्रयत्न करत आपली जबाबदारी निभावली.
याच कार्याचा विचार करत आज या सर्व कोविड योद्धांचा अर्थातच या देवदूतांचा विशेष सन्मान होने गरजेचे होते, म्हणूनच पिरंगुट ग्रामपंचायतीच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदार अभयजी चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पिरंगुट ग्रामपंचायतीला मिळालेला सन 2019-20 चा महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट ग्राम तथा आर. आर. आबा सुंदर गाव तालुका स्तरीय पुरस्काराचा व कोविड काळात ग्रामपंचायतने केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करत ग्रामपंचायतीचेही भरभरून कौतुक यावेळी केले.
तर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप जठार यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील कार्यक्षम ग्रामपंचायत म्हणून संबोधित करत गावचे प्रथम नागरिक सरपंच चांगदेवनाना पवळे, उपसरपंच लक्ष्मण निकटे, ग्रामविकास अधिकारी भोजने साहेब व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष कौतुक यावेळी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती विजय केदारी, जिल्हा परिषदेच्या सदस्या अंजली कांबळे, मंडल अधिकारी कांबळे साहेब, पोलीस पाटील प्रकाश पवळे, स्वाती गोळे, महादेव आण्णा गोळे, संतोषजी मंडले, गजानन पवळे,माऊली कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सर्व सन्मानार्थी व पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समलोचन संतोष गावडे सर यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी श्री भोजने यांनी केले. व उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार पिरंगुट ग्रामपंचायत सदस्य श् राहुल पवळे यांनी आभार मानले.
Share