ताज्या बातम्या
Trending
मुळशीत साकारणार मावळ-मुळशीचे नवे प्रांत ऑफिस, बावधनमधील कार्यालयाकरीता 3 कोटी 34 लाखांची मंजुरी, आमदार थोपटेंच्या प्रयत्नांना यश

महावार्ता न्यूज ः मुळशीतील तहसीलच्या अनेक कामांसाठी आता पुण्यात जाण्याचा वेळ वाचणार आहे. आता मावळ-मुळशीचे नवे प्रांत कार्यालय बावधन येथे होणार आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे बावधनमधील नव्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीकरीता 3 कोटी 34 लाखांची मंजुरी मिळाली आहे.
मुंबईत सुरू असलेल्या विधानसेभेची अधिवेशनात हिंजवडी आय टी पार्कसाठी नवी नगर परिषदेसाठी प्रयत्नशील असणार्या आमदारांनी सलग दुसर्या दिवशी मुळशीकरांना गोड बातमी दिली आहे. मुळशी हद्दीत बावधन येथील गायरानात आता नवे मावळ व मुळशीचे प्रांत कार्यालय उभे रहाणार आहे. यासाठी 3 कोटी 34 लाखांचे अंदाजपत्रक शासनाने मंजुर केले आहे.
नव्या आर्थिक वर्षात नव्या प्रांत कार्यालयाचे भूमिपूजन होणार असून त्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या जाणार आहे. याबाबत उपसचिव अजित देशमुख यांनी शासन निर्णय जाहिर केला असून याबाबत मुळशीतून आमदार संग्राम थोपटे यांचे आभार मानले जात आहे.
Share