
महावार्ता न्यूज: फिल्मी स्टाईलने सातारातून गज्या मारणेला अटक करण्यात मुळशीतील पौड पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झाला असून आता धोकादायक व्यक्ती असल्याने त्यास एम.पी.डी.ए.कायदयांर्गत १ वर्ष कालावधीकरीता स्थानबध्द करण्याकरीता येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
कुविख्यात गुंड गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचेविरूध्द खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी करणे, दरोडा तयारीत सापडणे,
गंभीर मारहाण करणे, मारहाण करणे अशाप्रकारचे २२ गुन्हे दाखल झालेले होते त्यानंतर दि.१५/०१/२०२१ रोजी कारागृहातून सुटून आल्यानंतर त्याने दहशत पसरवून ६ गुन्हे केलेले होते.
धोकादायक व्यक्ती असल्याने त्यास एम.पी.डी.ए.कायदयांर्गत १ वर्ष कालावधीकरीता
स्थानबध्द करण्याकरीता पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे
सविस्तर प्रस्ताव पाठविला होता त्याचे अवलोकन करून त्याचेविरूध्द स्थानबध्द करण्यासाठी सबळ
कारणे/पुरावे आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.श्री. राजेश देशमुख यांनी दिनांक ०२/०३/२०२० रोजी गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे यास स्थानबध्द करणेकामी आदेश दिलेले होते
परंतु गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे हा वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करून लपत होता. दि. ०६/०३/२०२१ रोजी मेढा पोलीस स्टेशन, सातारा जिल्हा येथील सहा. पोलीस निरीक्षक श्री. अमोल
माने, पो.हवा.जितेंद्र कांबळे, पो.ना. इम्रान मटेकरी, पो.कॉ.अमोल पवार यांना क्रेटा कार नं. हीमध्ये
गजानन पंढरीनाथ मारणे व त्याचे ३ साथीदार मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर पुणे
ग्रामीण पोलीसांनी त्यास जिल्हाधिकारी, पुणे याचे आदेशाप्रमाणे ताब्यात घेवून येरवडा मध्यवर्ती
कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करणेकामी जमा केलेले आहे.
भविष्यात देखील समाजास धोकादायक ठरणारे व्यक्ती, गुन्हेगारी टोळया आढळुन आल्यास त्यांचेवर पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य जनतेस
गुन्हेगारी टोळयांपासून त्रास असल्यास त्यांनी निर्भीडपणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी असे आवाहन
पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
नमुद गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचेविरूध्द एम.पी.डी.ए.कायदयांर्गत प्रस्ताव तयार
करून त्यास स्थानबध्द करेपर्यंत खालील नमुद अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नियुक्त केलेले होते व त्यांनी कार्यवाही केलेली आहे. पौड पो.स्टे.कडील १) पो. नि अशोक धुमाळ
२) सपोनि विनायक देवकर
३) पोउनि श्रीकांत जाधव ४)सहा पोउनि संतोष कुंभार, ५) पोलीस हवा संदिप सपकाळ,६) पोलीस हवा. शंकर नवले, ७) पोलीस हवा. नितिन रावते , ८) पोलीस हवा. सुधीर होळकर
९) पो.ना राॅकी देवकाते, १०) पो. ना. जय पवार
११) पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश पाटील, १२) पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख,१३) पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गायकवाड, १४) पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर जगदाळे,१५) पोलीस कॉन्स्टेबल सागर नामदास, १६) पोलीस कॉन्स्टेबल नामदेव मोरे,१७) पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोईटे
तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.नि.श्री. पद्माकर घनवट, स.पो.नि.सचिन काळे, स.पो.नि.
नेताजी गंधारे, पो.स.ई.रामेश्वर धोंडगे, पो.स.ई.अमोल गोरे, पो.स.ई.शिवाजी ननवरे, सहा.फौजदार दत्तात्रय जगताप, दत्तात्रय गिरमकर, शब्बीर पठाण,
यांनी कारवाईत सहभाग घेतला होता
Share