
महावार्ता न्यूज ः नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसकडेच हे पद राहणार, हे निश्चित मानलं जात आहे. काँग्रेसने अद्याप आपले पत्ते खुले केले नाहीत. मात्र आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून एक नाव ठळकपणे समोर आलं आहे.विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावान आमदार संग्राम थोपटे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस पक्षातील सूत्रांनी माहिती दिली आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी लवकरच संग्राम थोपटे यांच्या नावाची औपचारिक घोषणा
पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, पवारांच्या बालेकिल्ल्यात देखील संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा गड कायम राखला असून त्यांची एक वेगळी क्रेज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांच्यासारख्या निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी लवकरच संग्राम थोपटे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतरही पुणे जिल्ह्यात काँग्रेसकडून मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. तसंच संग्राम थोपटे हे गेले अनेक वर्ष काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा आणि पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. याच जिल्ह्यात थोपटे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावत ठेवला आहे. त्यामुळे आता निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Share