पुणे
Trending

पेरिविंकल स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात साजरा

महावार्ता न्यूज:  चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल च्या बावधन, सुस, पिरंगुट व पौड या चारही शाखांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यातआल्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल व संचालिका सौ. रेखा बांदल पोलिस नाईक सौ नीलम बुचडे, माजी नगरसेविका व समाजसेविका पुष्पाताई कनोजिया आदी मान्यवर उपस्थित होते . तसेच उपस्थित महिला मान्यवरांचा देखील महिलादिनाच्या निमित्ताने शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी महिला दिन का साजरा करतात त्या मागचा इतिहास मोजक्या शब्दात सांगून समस्त महिलांना शुभेच्छा देऊन सर्व घर सांभाळून जबाबदारीची धुरा पेलावणाऱ्या समस्त महिलांप्रति आदर व्यक्त केला.

पोलिस नाईक सौ नीलम बुचडे यांनी सर्व महिला कोरोना योद्धा कशा लढल्या व कशी ही तारेवरची कसरत करत सगळ्यावर मात करून कोरोना योद्धा बनल्या या बद्दलचे त्यांचे अनुभव व्यक्त केले.
तसेच समाजसेविका पुष्पाताई कानोजिया यांनी स्त्री शक्तीचा जागर व नारीशक्ती ची विविधता रूपे व वेगवेगळे पैलू अत्यंत हळुवारपणे उलगडून समस्त स्त्रीशक्तीला व आजच्या नारीला खरंच शतशः प्रणाम करून महिलांप्रति सदिच्छा व्यक्त केली.
महिला दिनानिमित्त सर्व शिक्षक महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

काही शिक्षिकानी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. काहींनी स्वतःमधले सुप्त गुण व कला सादर केल्या.पिरंगुट सुस व पौड शाखेमध्ये शिक्षिकानी करमणूक व मनोरंजनात्मक गेम्स चे आयोजन केले होते.
सर्व महिलांच्या कलागुणांना वाव देत शुभेच्छा देऊन महिला दिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला.
बावधन शाखेमध्ये कार्यक्रमाचे नियोजन हे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीलिमा व्यवहारे, सुस शाखेमध्ये सौ शिल्पा तर पिरंगुट शाखेमध्ये अभिजित टकले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close