पुणे
Trending
लवळे गावात एक कोटी साठ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन,उद्घाटन
गावातील 14 डॉक्टरांचा, सन्मान

महावार्ता न्यूज ः लवळे येथे एक कोटी साठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन करण्यात आले. गावडे वाडी येथील शालेय इमारतीसाठी सिंबायोसिस संस्थेच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली यावेळी तिचे भूमिपूजन करण्यात आले.
लवळे गावांमध्ये स्थानिक 14 डॉक्टर आहेत त्यांचा विशेष सन्मान यावेळी ग्रामस्थांनी केला. तसेच कोरोना योद्धा म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. गावातील डॉ विजय हिरामण सातव आणि डॉ सोनाली विजय सातव या डॉक्टर दाम्पत्यांचा आदर्श ठेवून गावामध्ये डॉ.शरद गोठे,डॉ.प्रसाद गुगळे , डॉ. प्रविण कुदळे ,डॉ. अक्षदा पोटे ,डॉ काजल कळमकर ,डॉ तेजल कळमकर ,डॉ स्नेहा सातव ,डॉ धनश्री राऊत – सातव ,डॉ.शुभम सातव ,डॉ. ऋषिकेश शितोळे हे सर्व जिद्दीने अभ्यास करून डॉक्टर झाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे तसेच उद्योजक नाथाजी राऊत आणि सरपंच निलेश गावडे आणि ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
लवळे ग्रामपंचायत ही मुळशी तालुक्यातील या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध झाल्यामुळे सरपंच निलेश गावडे उपसरपंच रंजीत राऊत ग्रामपंचायत सदस्य संजय आबा सातव, बाळासाहेब राऊत,शिवराम सातव, अजित चांदीलकर, राहुल खरात, सुजाता दत्तात्रय मोरे,नर्मदा बाळासाहेब टकले, किमया गणेश गावडे,वर्षा ऋषिकेश राऊत, सारिका पोपट कळमकर,सायली अमोल सातव, साधना महेश सातव, श्रीमती राणी रामदास केदारी तसेच ग्राम विकास अधिकारी व्ही डी साकोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर उपसभापती विजय केदारी, महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे ,सिम्बॉयसिस संस्थेच्या नीलिमा घुगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Share