
महावार्ता न्यूज: मुळशी खुर्द येथील शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखाच्या मृत्यूचे गुढ उलगडले असून या खूनाचा तपास पौड पोलिसांनी अवघ्या 8 तासांत केला आहे. 2 जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 जाणाला अटक करण्यात आली आहे
मुळशी गावातील दिशाज हॉटेलचे पुर्वेस 200 मीटरवर मानगाव ते पुणे रस्त्याचे उत्तरेस रस्त्याचे खाली 9 फुटावर विजय सर्जेराव सुर्वे वय ४० वर्षे, रा. मोहन नगर, चिंचवड इस्ट, पुणे १९ यास कोणत्या तरी अज्ञात इसमानी, अज्ञात कारणा वरून, अज्ञात ठिकाणी त्याचे तोंडावर, मानेवर व डोक्यात टणक व बोथट हत्याराने मारून खुन केला होता., त्याची बॉडी पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने मुळशीत आणुन टाकली होती.
खुना सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याचे दिसुन आल्याने पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. यानुसारो लीस निरीक्षक, भालचंद्र शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक विनायक देवकर, सहा. पोलीस निरीक्षक, श्रीकांत जाधव, पोलीस उप निरीक्षक, मृगदीप गायकवाड पोलीस उप निरीक्षक, सहा.उप निरीक्षक सचिन शिंदे, सहा.उप निरीक्षक संतोष कुभार, पोलीस हवा, शंकर नवले, अनिता रवळेकर, पोना रॉकी देवकाते, पोना शेखर हगवणे, यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचे
बारकाईने निरीक्षक केल्यानंतर मा. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी एक तपास पथक पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये आरोपीचा शोध घेण्याकरता रवाना केले.
खूनात मृत झालेल्या सुर्वे यांच्या जवळील मोबाईलवरून आरोपींना शोधण्यासाठी मदत झाली. तांत्रीकदृष्टया तपास करून आरोपी हार्षद अशोककुमार राठोड, वय २९ वर्षे, रा. ऐलीगंट रेसिडेंसी, निगडी, पुणे याचा शोध घेण्यात् आला या गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता, सदरचा गुन्हा त्याचा साथीदार मोहम्मद( पुर्ण
नांव पत्ता माहित नाही) असे दोघानी मिळून केल्याचे कबुली दिली ह
आरोपी हार्षद राठोड यास सदर
गुन्हयामध्ये अटक करण्यात आली असून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पो, कॉ. सुनिल कोळी व पो. कॉ.
चेतन पाटील, सायबर पोलीसांची मोलाचे सहकार्य केले.
Share