ताज्या बातम्या
Trending
मुळशीत कोव्हिड लसीकरणाचा भोंगळ कारभार, माले केंद्रातील लस दिली गेली माणमध्ये
लसीकरण कमी, नव्या ग्रामपंचायत कारभार्यांकडून जाहिरात अधिक

महावार्ता ः मुळशीत कोरोना वाढता आकडा असताना लसीकरणात भोंगळ कारभार दिसून येत आहे. भूगावमधील जेष्ठ नागरिकांना माले येथील प्राथमिक आरोग्य नोंदणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात माले केंद्रात लसीकरण करण्यात आले. पिरंगुटसह अनेक गावात वेळेवर लस न आल्याने अनेकांना ताटकळत बसावेही लागले.
देशात 60 वर्षांवरील सर्वांना मोफत कोव्हिड लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र मुळशीत नियोजन अभावी लस कधी व कोठे घ्यावी यााबाबत ग्रामस्थ सांशक आहेत. लसीकरणाबाबत प्रशासनाकडून कोणतिहि माहिती सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यात आली नाही. यामुळे गावात लस मिळणार का माले की माण प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
गुरूवारी माले आरोग्य केंद्रावर अनेकांनी ऑनलाईल लसीकरणाकरीता नावे नोंदविली होती. मात्र माले येथे पहिली लस उपलब्ध झाली नाही. यामुळे माण येथे लसीकरणास जाण्यास सांगण्यात आले. यामुळे जेष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
हिंजवडीसह तालुक्यात अनेक राजकीय पुढार्यांनी मोफत लसीकरणाची सोशल मिडियावर केली आहे. या जाहिरातीसाठी स्पर्धा सुरू असताना लसीकरण होते की नाही याबाबत पुढारी अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. हिंजवडीतही वेळेवर लस उपलब्ध झाली नाही. मात्र माण आरोग्य केंद्रात लसीकरणसाठी मोठी गर्दी होती.
मुळशीत कोरोना आकडा दिवसेंदिवस वाढत असून भूगाव, हिंजवडी, माण, सूस व बावधनमध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत. तरीही या भागात लसीकरणााबाबत जागरूकता दिसून येत नाही.
Share