ताज्या बातम्या
Trending

मुळशीतील वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण ? पोलिस की प्रशासन यंत्रणा

महावार्ता न्यूज ः पुणे शहर शेजारील मुळशी तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू पसरत असून याला पोलिस आणि प्रशासन यंत्रणा जबाबदार असल्याचे चित्र दिसत आहे.
मुळशीत बावधन, भूगांव, भुकूम, सूस, हिंजवडी, बावधन, माण गावात पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शनिवारी मुळशीतील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांचा आकडा 350 च्या घरात गेला होता. पोलिस आणि तहसील तसेच ग्रामपंचायती यंत्रणा सतर्क नसल्याने मुळशीतील सध्या सरासरी 20 रूग्ण सापडत आहेत.
गतवर्षी पहिल्या कोराना लाटेत मुळशीतील पोलिस यंत्रणेने मोठे काम केले होते. भूगाव, घोटावडे फाटा, पौड येथे तपासणी कक्ष होते. शनिवार-रविवार पर्यटकांना पुन्हा पाठवले जात होते. यंदा मास्क न वापरण्याच्या कारवाई पलीकडे पोलिस यंत्रणा काहीच करताना दिसत नाही.
मुळशीतील अनेक हॉटेल रात्री ऊशिरापर्यंत सुरू आहेत. त्यात भूगाव, भुकूम, घोटावडे फाट्यावरील लग्न कार्यलयात 1000 पेक्षा अधिक वर्‍हाडीही दिसत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने मुळशीत कोरोना पुन्हा वेगाने डोके वर काढत आहे.
मुळशीतील तहसील यंत्रणाही कोरोनाबाबत झोपी गेलेली दिसत आहे. तहसील कचेरीच्या परिसरातच विनामास्कची गर्दी रोज दिसत आहे. ना मास्क, ना सॅनिस्टायझर हे चित्र पंचायत समितीसह इतर शासकीय कार्यालयातही पहाण्यास मिळत आहे.
पिरंगुट, भूगाव, हिंजवडी येथील बाजारात मोठी गर्दी उसळत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने अधिक कडक पाऊले उचलण्याची गरज आहे. यासाठी पोलिस व तहसील यंत्रणेचा आदेशही निघाला पाहिजे.
मार्च अखेरीस कोरोनाबाबत प्रशासन सतर्क न झाल्यास 1000 रूग्णसंख्येपर्यंत मुळशीतील कोरोना रूग्णाची संख्या जाण्याचा धोका आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close