
महावार्ता न्यूज: मुळशीतील आय टी पार्कमधील माण गावात बेकायदेशीर व्हिडिओ गेम सेंटरवर कारवाई करून 1 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
माण गाव ता.मुळशी जि.पुणे येथे बेकायदेशीर व्हिडीयो गेम सेंटर एक इसम चालवित असल्याबाबत माहीती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यानी कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार दि. २०/०३/२०२१ रोजी माण गावात जावुन कारवाई केली. व्हिडिओ गेम खेळणारे इसम पोलीसांची चाहुल लागताच तेथुन पळुन गेले. व्हिडीओ सेंटर चालवणारा तिसप्पा नारायन ग्रानेणा वय ३५ वर्ष रा. माणगाव ता.मुळशी.जि.पुणे याला अटक करण्यात आली. आरोपीकडून एकुण ४८,८२०/- रकमेचे
इलेक्ट्रॅनिक्स मशिन व रोख रक्कम जप्त करण्यात आले. हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं.२००/२०२१ जुगार अधि १८८७ कलस ४५५ प्रमाणे गुन्हा दाखल असून, पुढील तपास तपास अधिकारी
करीत आहेत.
पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गशनाखाली पो. उप निरीक्षक यशवंत साळुंके, पो हवालदार नितीन पराळे, रवी पवार ,पोलिस शिपाई आकाश पांढरे, अली शेख, अक्षव भोरे यांनी यशस्वी कारवाई केली.
Share