देशविदेश
Trending
मुळशी धरणात करंडक वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध
शैवालाचा एक प्रकार असलेली करंडक वनस्पती एकपेशीय प्रजाती आहे

आघारकर संशोधन संस्थेतील संशोधक डॉ. कार्तिक बालसुब्रमण्यम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुळशी धरणात करंडक वनस्पतीची (डायटम) नवी प्रजाती शोधली आहे. या प्रजातीचे ‘एपिथेमिया आघारकरी’ असे नामकरण आघारकर संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. एस. पी. आघारकर यांच्या नावावरून करण्यात आले आहे.
शैवालाचा एक प्रकार असलेली करंडक वनस्पती एकपेशीय प्रजाती आहे. नद्या, धरणे अशा स्वच्छ पाण्यात ती आढळते. ऑक्सिजन निर्मितीमध्ये वनस्पतीची अतिशय महत्वाची भूमिका असते. डॉ. कार्तिक सुब्रमण्यम यांनी विघ्नेश्वरन यांच्या सहकार्याने मुळशी धरणात संशोधन के ल्यावर त्यांना करंडक वनस्पतीची नवी प्रजाती आढळली. या प्रजातीचे नामकरण ‘एपिथेमिया आघारकरी’असे करण्यात आले आहे. नव्या प्रजातीच्या संशोधनाचा शोधनिबंध ‘फायटोटाक्सा’ या संशोधनपत्रिके त प्रसिद्ध झाला आहे.
Share