पुणे
Trending
हिंजवडी, माण परिसरात कोरोना रुग्ण अधिक, लसीकरणात सावळा गोंधळ
लसीच्या तुटवड्यामुळे आरोग्य केंद्रात तासनतास बसून राहण्याची नागरिकांवर वेळ

महावार्ता न्यूज: हिंजवडी, माण, मारूंजी गावात मुळशीतील सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण असतानाही या गावात कोव्हिड लसीकरणात तीन तेरा वाजले आहेत.
माण प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम गेल्या महिन्यात 8 मार्च पासून सुरू करण्यात आली. मात्र नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेल्या संभ्रमावस्थेमुळे व लसीच्या तुटवड्यामुळे महिनाभरात केवळ 3469 लोकांना लस देण्यात आली.
माण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या २२ गावासाठी माण घोटवडे व नेरे या तीन ठिकाणी कोरोनाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
सुरुवातीला आरोग्य , शासकीय कर्मचारी तसेच पोलीस व ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. तर गेल्या 2 दिवसापासून ४५ वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण सुरू केले आहे.
माण आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि 6) केवळ 200 नागरिकांना लसीकरण देण्यात आले. मात्र दुपारी च लस संपल्यामुळे लसीकरणास आलेल्या नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागले. त्यामुळें नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
याबाबत तालूका आरोग्य अधिकारी डॉ अजित कारंजकर यांच्या शी संपर्क साधला असता ते म्हणाले,तीन ठिकाणी लसीकरण सुरू केल्याने काही आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त केले आहेत. मुळशी साठी लस भरपूर मिळत आहे. मात्र काही केंद्रावर दोन दोन दिवस लस शिल्लक राहत असल्याने ती इतर केंद्रांवर पाठविण्यात येत आहे. लसीकरणाबाबत मुळशी तालुका आघाडीवर आहे. अपेक्षेप्रमाणे चांगली टक्केवारी मध्ये लसीकरण होत आहे मात्र नागरिक अद्याप अन्नभिन्न असल्याने स्थानिक नागरिक लसीकरनाला येत नाही.
आरोग्य कर्मचारी वाढविण्याची मागणी
माण प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीच्या पुरवठ्यासोबत आरोग्य कर्मचाऱ्यांचाही तुटवडा असल्याचे ग्रामपंचायत सदस्या रुपाली बोडके यांच्या निदर्शनास आले. प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटी दरम्यान त्यांनी पत्रकारांना सागितले.त्या म्हणाल्या राज्यभर नावाजलेल्या या आरोग्य केंद्रात डॉक्टर्स नर्सेस व आरोग्य कर्मचारी ज्या पटीत पाहिजेत तेवढी संख्या उपलब्ध नसल्याने येथील रुग्णसंख्या व दैनंदिन ओपीडी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ आरोग्य सेवक वाढविले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
Share