महाराष्ट्र
Trending
लसीकरणात मुळशी जिल्ह्यात आघाडीवर, कोरोना रूग्णसंख्या 859, तीनही कोव्हिड सेंटर सज्ज
19 गावांत कोरोना रूग्ण असून 15 गावांमध्ये लसीकरण, पहिला डोस 23390 तर दुसरा डोस 1330

महावार्ता न्यूज ः मुळशी तालुक्यात कोरोना लसीकरण वेगाने होत असून आतापर्यंत 41 टक्के लोकांनी लस घेतली आहे. पुणे जिल्ह्यात मुळशी लसीकरणात आघाडीवर असून वाढत्या कोरोना रूग्णासाठी कासारअंबोली, हिंजवडी व बावधन येथील कोव्हिड सेंटरही सज्ज आहेत.19 गावांत कोरोना रूग्ण असून 14 गावांमध्ये लसीकरण सुविधा दिली जात आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात मुळशी तालुक्याला दुसरी लाटेत यश मिळत आहे. विशेषतः लसीकरणात मुळशी जिल्ह्यात नंबर वनवर आहे. 24729 जणांनी मुळशीत लस घेतली आहे. पहिला डोस 23390 तर दुसरा डोस 1330 लोकांनी घेतला आहे. मुळशीत 14 गावांमध्ये लसीकरण सुविधा झाल्याने तालुक्यात वेगाने लस देण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी अजीत कारंजकर हे स्वतः जातीने लसीकरणाबाबत सतर्क असल्याने मुळशीने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
कोव्हिड चाचणी केंद्र –
कासारआंबोली, हिंजवडी, सिम्बायोसिस, रूबी हॉल
कोरोना रोखण्यासाठी पंचायत समिती आणि तहसील यंत्रणेने कासारअंबोली, हिंजवडी व बावधन येथील कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू केली आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये 88 रूग्ण उपचार घेत आहे. मेडिकल सुविधा आरोग्य विभागाने दिल्या असून जेवण व स्वच्छता याकडे तहसील यंत्रणा लक्ष देत आहे. गतवर्षी या कोव्हिड सेंटरबाबत सतत तक्रारी येत होत्या. आता तहसीलदार अभय चव्हाण यांनी योग्य नियोजन केल्याने व गटविकास अधिकारी संदिप जठार हे कोव्हिड सेंटरला भेट देत असल्याने रूग्ण बरा होण्याचा वेगही वाढला आहे.
मुळशी कोरोना अपडेट
एकूण रूग्णसंख्या – 859
गृह विलीगीकण रूग्ण – 689
कासारआंबोली कोव्हिड सेंटर – 44 रूग्ण
हिंजवडी कोव्हिड सेंटर – 22रूग्ण
बावधन कोव्हिड सेंटर – 22रूग्ण
एकून रुग्ण 6499
आजअखेर बरे झालेले 5450
आजअखेर नोंद झालेले मृत्यु 119
Date : 7/4/2021
आज झालेली नोंद 71
आज गाव निहाय नोंद झालेले रुग्ण
Andgaon 1 Bavdhan 3 Belavade 1 Bhare 1 Bhugaon 13 Darvali 2, Ghotavade 2, Hinjewadi 5
Kasarsai 1, Kasaramboli 2, Kondhavale 1, Poud 5, Maan 3, Mhalunge 2, Marunji 7 Mulkhed 4, Pirangut 10, Sus 5, Uravade 3
कासारअंबोलीत 96, हिंजवडीत 50 तर बावधनमध्येही 50 खाट्यांची सोय करण्यात आली आहे. बावधनमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोव्हिड सेंटर सुरू आहे. मुळशीतील लवळे येथहल सिम्बायोसिस तर हिंजवडीमधील रूबी हॉल हॉस्पिटल तसेच हिंजवडीतील विप्रोमध्ये कोव्हिड रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
कोव्हिड उपचार सुविधा-
कासारआंबोली कोव्हिड सेंटर , हिंजवडी कोव्हिड सेंटर , बावधन कोव्हिड सेंटर , विप्रो हॉस्पिटल, हिंजवडी, सिम्बायोसिस हॉस्पिटल – लवळे, रूबी हॉल हॉस्पिटल – हिंजवडी
लसीकरण सुविधा –
माण, मुठा, माले, आंबवणे , ग्रामीण रुग्णालय पौंड, पिरंगुट
कोळवण, अंबडवेट, उरवडे, भुकूम, बावधन
सूस, घोटावडे, नेरे, मुळशी खुर्द
Share