
महावार्ता न्यूज ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त बावधन येथे अभिवादन करण्यात आले. सिद्धार्थ युवा प्रतिष्ठान व धम्मदीप बुद्ध विहार बावधन या ठिकाणी हिंजवडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बाळकृष्ण सावंत यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक होते, त्यांचं अतुलनीय कार्य भारतीय जीवनात दूरगामी परिणाम करणारं ठरलं आहे, असे विचार यावेळी मांडण्यात आले.
या प्रसंगी युवा नेते विठ्ठलतात्या गायकवाड, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष उमेश कांबळे, सनी कांबळे, अभिजित कांबळे, सुमित गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशावर आलेल्या कोरोना संकटाच्या महामारीमुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. सर्व बांधवांनी महामानवाला घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सावंत यांनी केले आहे.
Share