क्राइम
Trending
मुळशीत कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याने 108 जणांकडून 70 हजारांचा दंड वसूल
पौड पोलिसांची कोरोना विरुद्ध धडक मोहीम

महावार्ता न्यूज: मुळशी तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी पौड पोलिस सतर्क झाले असून शुक्रवार-शनिवार दोन दिवसांत कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याने 108 जणांवर कारवाई करून 70 हजारांचा दंड पौड पोलिसांनी वसूल केला आहे.
शनिवारी पौड पोलीस स्टेशन हद्दीत मास्क न घालता फिरणाऱ्या 39 लोकांवर कारवाई केलेली असून त्यांच्याकडून 19500 रुपये दंड वसूल केला आहे.
कोव्हिड नियमाचे पालन न केल्याने एकूण 4 दुकानांवर कारवाई करून 4000/- दंड वसूल केलेला आहे. तसेच 7 टू व्हीलर चालक यांचेकडून 7000 रुपये दंड तर 1 चारचाकी चालक यांचे कडून 1000 रुपये दंड वसूल केला आहे
शनिवारी 39 व्यक्ती, 4 दुकानदार, 8 वाहने चालक, असे एकूण 51यांचेवर कारवाई करून 31500 हजर रुपये दंड वसुल करण्यात आला.
शुक्रवारी पौड पोलीस स्टेशन हद्दीत मास्क न घालता फिरणाऱ्या ३६ लोकांवर कारवाई करून १८००० रुपये, ५ दुकानांवर कारवाई करून ५०००/- तसेच ११ टू व्हीलर चालक यांचेकडून ११००० रुपये दंड तर २ चारचाकी चालक यांचे कडून २००० रुपये दंड वसूल करण्यात आला
शुक्रवारी 38 व्यक्ती, ६ दुकानदार, १३ वाहने चालक, असे एकूण ५७ कारवाई करून ३८००० हजर रुपये दंड वसुल केलेला असून सदरची कारवाई ही चालूच राहणार आहे.
मुळशीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ
यांनी केले आहे.
कोरोनाबाबतच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार – अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलीस स्टेशन*
*व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा*
????
https://m.facebook.com/groups/1354534931590916/permalink/1504325759945165
Share