जगाच्या पाठीवर
Trending

हिंजवडीतील बगाड सोहळा सलग दुसर्‍या वर्षी खंडित, कसा असतो बगाड सोहळा जाणून घ्या महावार्तावर

महावार्ता न्यूज ः चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला होणाऱ्या वाकड-हिंजवडीसह तमाम मुळशी तालुक्याचे व पुणे जिल्ह्यातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हातोबा देवाचे बगाड मिरवणूक व यात्रा यंदा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली आहे मात्र धार्मिक विधीवत, पूजा-अर्चा पूर्ण करून देशावरील संकट दूर करण्यासाठी हिंजवडी ग्रामस्थ श्री म्हातोबा चरणी प्रार्थना करणारआहे.
हजारो वर्षांपासून सुरु असलेल्या या ऐतिहासिक बगाड मिरवणूकीत पहिल्यांदाच खंड पडल्याने हजारो भाविकांचा हिरमोड झाला आहे. मात्र अशा असंख्य भक्तांसाठी व खास लोकमतच्या वाचकांनासाठी ह्या यात्रेची काही विशेष वैशिष्ट्य व संपूर्ण माहिती आपल्याला देत आहोत. हनुमान जयंतीच्या म्हणजेच यात्रेच्या १० दिवस आधी देव बसतात आणि वाकड-हिंजवडी ग्रामस्थांचा उपवास सुरू होतो. या १० दिवसांत प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा होत नाही, ना कुठला (लग्न, साखरपुडा, वास्तूशांती) सोहळा पार पाडतो. या काळात सर्व काही वर्ज्य असते. बगाडाला नैवद्य दाखवूनच उपवास सोडला जातो. याही वर्षी ३० मार्च पासून अनेकांचे उपवास सुरु आहेत.
हनुमान जयंतीला दुपारी ४नंतर हिंजवडी गावाठानातून वाकडच्या दिशेने बगाड मीरवणूक निघते, मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक वाकड हिंजवडीत जमतात. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या बगाडाच्या प्रथेला सुरुवात कधी पासून झाली याबाबत नेमके गावातील कोणालाही काहीही सांगता येत नाही वर्षानुवर्षे चालत आलेला हा पिढी-परंपरागत उत्सव असून अनेक पिढ्यांनी हि प्रथा जोपासली, बगाड परंपरा वारसा रूपाने पुढच्या पिढीकडे आली. वाकड गावठाणातील मंदिराच्या जुन्या गाभार्याच्या चौकटीला शिल्प होते त्यावर सोळाशे पस्तीस असे कोरलेले आढळले असल्याने इसवी सन सोळाशे पस्तीस साली म्हातोबा महाराजाचे मंदिर बांधले आहे त्याच्या हि अगोदर वाकड हिंजवडीत देवाचे अस्तित्व असल्याचे मानले जाते.
श्री म्हातोबा महाराजांचे मूळ ठाणे आडगाव बार्पे जंगलात आहे त्यामुळे हा मान पिढी परंपरागत आडगाव बार्पेला देण्यात आल्याने पंचक्रोशीत इतरही घनदाट जंगले असताना बगाडाच्या शेलाचे लाकूड आणण्यासाठी आडगाव बारप्याच्याच जंगलात ग्रामस्थ जातात. हेे लाकूड मोठ्या लांबीचे, सरळ व मजबूत बुन्द्याचे साधारणतः तीस फुट लांबीचे असायला पाहिजे. शेल म्हणजे लाकूड शेलेकरी म्हणजे बगाडाचे लाकूड आणण्यासाठी पायी गेलेले ग्रामस्थ, शेलेकरी वाकड हिंजवडी मधील कोणताही रहिवाशी होवू शकतो शेलेकरी होण्यासाठी वेगळा मान लागत नाही, लाकूड आणायला गेलेल्या प्रत्येकाला शेलेकरीच म्हणले जाते.

श्री म्हातोबा देवाचे अस्तित्व वाकड हिंजवडी या दोन्ही गावात असल्याने दोन्ही गाव मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा करतात त्यामुळे बगाडाची उभारणी करण्याच्या मान वाकड हिंजवडी गावातील सुतार कारागिराचा असतो दोघे सुतार व ग्रामस्थांच्या मदतीने बगाडाची उभारणी केली जाते, त्यासाठी पारंपारिक पद्धतीचा वापर केला जातो. जांभूळकर परिवाराचे मूळ तीन वाडे आहेत दरवर्षी तीन पैकी एका वाड्यातील विवाहित सदस्याची गळकरी म्हणून निवड केली जाते हि निवड अचानकपने केली जाते. बगाड मिरवणुकीची तयारी पूर्ण झाल्यावर जमलेल्या ग्रामस्थासमोर मिरवणूक निघण्याच्या अर्धा तास आधी गावचे साखरे पाटील गळकरयाच्या नावाची घोषणा करतात.

गळकरयाला हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेऊन मंदिरात गळकय्राला हिंजवडीच्या महिला हळद लावतात मग गळकरकय्राला होळीवर चांगभले चांगभले च्या घोषात आणले जाते या ठीकाणी सुतार समाजाचे मानकरी गळ टोचतात मग गळकर्याला बगाडावर बसविले जाते दुपारी साडे चारच्या सुमारास बगाडाच्या मिरवणुकीला हिंजवडी गावठानातून सुरुवात होते, गावठानातून भूमकर वस्ती सायकर वस्ती भुजबळ वस्ती या मार्गे दोन किलो मिटरचे अंतर पार करून हजारो भाविकांसह बगाडाची मिरवणूक वाकड येथील एका शेतात येते गावातील मंदिरातून श्री म्हातोबा महाराजांची पालखी गळकर्या च्या भेटिला येते या शेतात गळकरी व देवाची भेट होते मग तिथुन बगाड मार्गस्थ होते बगाड वाकड गावठाणातील श्री हनुमान मंदिराच्या समोर आल्यावर श्री हनुमान चे दर्शन करूण येतो व या चौकात मध्ये मातंग समाजाच्या एका माणसाची मांडी कापली जाते व त्याच्या रक्ताचा टिळा गळकर्याला लावला जातो मग बगाड श्री म्हातोबा मंदिर परिसरात पोहचते . गळकर्याला मंदिरात आणले जाते व देवासमोर गळ काढले जातात त्याची पूजा अर्चा करून त्याला मंदिरात बसविले जाते, तीन दिवस मंदिरात बसलेल्या गळकरयाचे आलेले भाविक दर्शन घेतात. दुसर्या दिवशी देवाचा थोरला छबिना निघतो या दिवशी काट्याची पालखी निघते एका पालखीत काटे टाखलेले असतात यात पालखी मध्ये वाकड च्या पाटलाची सुनेचा मान आसतो तिसर्या दिवशी आखाड होऊन नाथसाहेबांचा चांगभले चांगभले च्या घोषात यात्रे ची सांगता होते त्यानंतर एका महिन्याच्या आंत गळकरी झालेल्या परिवाराकडून गावाला जेवण दिले जाते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close