पुणे
Trending

हिंजवडीकरांनी रक्तदान करून साजरा केला आरोग्यदायी उरूस, विक्रमी 205 जणांनी केले रक्तदान, मुळशीत होतेयं कौतुक

महावार्ता न्यूज ः चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती दिनी सार्‍या जगाचे लक्ष बगाड सोहळा पहाण्यासाठी हिंजवडीकडे वेधलेले असते. यंदा कोरोनामुळे ऐतिहासिक बगाड परंपरा खंडित झाली तरी विक्रमी 205 ग्रामस्थांनी रक्तदान करून आरोग्यदायी उरूसाची नवी परंपरा केल्याने हिंजवडीकरांचे कौतुक पंचक्रोशीत होत आहे.
गावात आणि परिसरात कोव्हिड रूग्ण वाढत असल्याने हिंजवडी गावाने ग्रामदैवत म्हतोबाच्या उत्सवा दिनी यंदा रक्तदानाचा संकल्प केला होता. सार्‍या ग्रामपंचायती सदस्यांनी एकत्र येऊन गावात रक्त देण्याचे आवाहन केले होते. याला संध्याकाळपर्यंत प्रतिसाद लाभला.
ससून हॉस्पिटलच्या सहकार्याने हिंजवडी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 205 लोकांनी रक्तदान केले. या शिबीराच्या सुरूवातीला हिंजवडीत कोव्हिड हॉस्पिटल सुरू करणार्‍या 6 वरिष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच गणेश जांभुळकर, उपसरपंच रेखा संदिप साखरे, हिंजवडीचे मा. उपसरपंच व भाजपाचे नेते तानाजी हुलावळे, संदिप साखरे, बाणेर नागरी पंतसंस्थेचे यशवंत साखरे,शिवनेनेचे नेते बाबासाहेब साखरे, शरद जांभुळकर, अरूण साखरे उमेश साखरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close