ताज्या बातम्या
Trending
मुळशीत कोरोनाची लाट, निम्मी मुळशी कोरोनाग्रस्त, 42 गावात 1235 रूण
पिरंगुटमध्ये लसीकरण सुरू, ऑनलाईन बुकींग आवश्यक

महावार्ता न्यूज: मुळशीत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यात 42 गावात 1235 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाला 300 पेक्षा अधिक रूग्णसंख्या पोहचल्याने निम्मा मुळशी तालुका कोरोनाग्रस्त बनला आहे.
मुळशी तालुक्यात पिरंगुट येथे आजपासून दुसरे 18 ते 45 वर्षा पर्यंत लाभार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे .याठिकाणी कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहे .
ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तारीख व वेळ बुक केल्यानंतर या ठिकाणी लस दिली जाईल .
याठिकाणी लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन होणार नाही .तसेच बुकींग शिवाय आलेल्या कोणालाही लस मिळणार नाही .
बावधन-भूगांवपासून ते मुळशी धरणापर्यत दुसरीकडे हिंजवडीपासून ते दासवे पर्यंत तालुक्यात सर्वच खोर्यात कोरोनाने सावट पसरले आहे.
आय टी पार्कचा परिसरातील गावे हाॅटस्पाॅट झाली असून हिंजवडीत मंगळवारी सर्वांधिक 55 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.
मुळशीतील कोरोना बाधित गावानुसार रुग्ण संख्या
Share