पुणे
Trending

मुळशीतील शेरे-धनगर वस्तीवरील अंधार स्वातंत्र्यानंतर प्रथमच दूर

मुळशीतील शेरे गावातील धनगर वस्ती वरील अंधार स्वातंत्र्यानंतर प्रथमच दूर होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार या वस्तीवर लवकरच विज पोहोचणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी वीजपुरवठ्याची मागणी केली होती
 मागणीनुसार सुळे यांना त्याबद्दलचे निवेदन दिले होते त्या निवेदनाची ची दखल घेत खासदार सुळे यांनी पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता  राजेंद्र पवार व कार्यकारी अभियंता मुळशी विभाग रविंद्र सिंह बुंदेले यांना दूरध्वनी करून या वस्तीच्या वीजपुरवठ्याचे काम तातडीने सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्या कामाला सुरुवात झालीअसून महावितरणचे इलेक्ट्रिक पोल बसवण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात हे काम पूर्ण होऊन धनगर वस्तीवर विज पोहोचणार आहे.
सदर कामाची सुरुवात करताना  बाबा कंधारे ,मुळशी महावितरण उपविभागीय अधिकारी फुलचंद फड, सरपंच संतोष ढमाले, पो- पाटील सुरेश तिकोने, मा. उपसरपंच अमर गायकवाड, मारुतीराव चौधरी, ग्रामसेवक यादव , व ग्रामस्थ अविनाश ढमाले विशाल जाधव लक्ष्मण गोरे विठ्ठल गोरे धोंडीबा गोरे सुनील गोरे उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close