
महावार्ता न्यूज: पुणे जिल्ह्यातील 260 गावांना कोव्हिड हाॅटस्पाॅट अलर्ट देण्यात आला असून मुळशीतील 15 गावांचा समावेश आहे.
शनिवारी रात्री पुणे जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट अलर्ट गावांच्या अमंलबजावणी आदेश पुणे जिल्ह्याधिकार्यांना जाहीर केला. यात मुळशीतील बावधन, हिंजवडी, माण, भुकूम, भुगांव, दिसली, सूस, कासारअंबोली, पिरंगुट, लवळे, मारूंजी, उरावडे, जांबे, घोटावडे, म्हाळुंगे या गावांचा समावेश आहे. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी या गावात कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. आवश्यक त्या उपाययोजना करावयाचे सर्व अधिकार तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.
कोव्हिड अलर्ट गावांना जिल्ह्याधिकार्यांनी दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे
तालुकास्तरीय अधिकारी यांच्या सूचना
कोव्हिड अलर्ट सर्व ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय अधिकारी यांनी भेटी देऊन प्रतिबंधात्मक
उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे.
सर्व गावस्तरीय समित्या कार्यन्वित कराव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच कामाचे वाटप योग्य
प्रकारे झाले आहे का याची खात्री करावी.
पोलीस विभागाने वरील ग्रामपंचायत क्षेत्रात गस्त वाढवावी जेणेकरून
विनाकारण बाहेर फिरणा-या नागरीकांची संख्या कमी होणेस मदत होईल.
वरील सर्व गावांमध्ये लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल याप्रमाणे नियोजन करावे.
जेणेकरून कोविड-19 चा संसर्ग आटोक्यात आणणे शक्य होईल.
नागरिकांसाठी सूचना
अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त गावातील नागरीकांनी बाहेर पडू नये, आरोग्यविषयक कामकाज
असेल तरच शक्यतो बाहेर पडावे.कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात कुटुंबा समवेत असतानाही मास्कचा वापर करावा.
सहव्याधी असणारे नागरीक तसेच ज्येष्ठ नागरीक यांनी घराबाहेर पडू नये.
अत्यावश्यक बाबीसाठी बाहेर पडल्यानंतर सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 चे
कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Share