
महावार्ता न्यूज: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी माण ग्रामपंचयातीने गावातील प्रत्येक घराची औषध फवारणी, सर्वेक्षण करून कोव्हिड सुरक्षा किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. माण ग्रामपंचायतीचा हा उपक्रम पुणे जिल्ह्यात आदर्श ठरला आहे.
ग्रामस्थांना देण्यात आलेल्या कोव्हिड सुरक्षा किटमध्ये प्रत्येक कुटूंबाला 30 मास्क , दोन डेटॉल साबण, दोन हँडवॉश व दोन सॅनिटायझरच्या बाटल्या असे साहित्य भेट देण्यात आले. गावातील वाडीवस्तीवरील व सोसायटी मधील सुमारे 5000 कुटूंबाना पहिल्या टप्यात हे घरपोच देणार असल्याचे सरपंच अर्चना आढाव यांनी महावार्ताला सांगितले.
या सुरक्षा कीटचे वाटप
मुळशी पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्या हस्ते या मंगळवारपासून करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग राक्षे, सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच प्रदीप पारखी, सदस्य संदीप साठे, रवी बोडके, देविदास सावंत, शशिकांत धुमाळ, विजय भोसले , रुपाली बोडके, सचिन आढाव, अमृता हिंगडे,राम गवारे, दीपक गवारे, नितीन पारखी, ग्रामविकास अधिकारी बी आर पाटील यांच्यासह लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
Share