क्राइम
Trending
मुळशीत मेडिकल दुकानावर पोलिसांची कारवाई, इतर वस्तू विकत असल्याने भुगावमधील मेडिकल केले सील

महावार्ता न्यूज: मुळशीतील भुगावमधील श्री सेवा मेडिकल पौड पोलिसांनी शनिवारी रात्री सील केले. औषधा व्यतिरिक्त इतर वस्तुंसाठी दुकानात गर्दी होत असल्याने पौड पोलिसांनी तहसील आदेशानुसार मेडिकल सील केले आहे.
शनिवारपासून मुळशीत भुगांवसह 11 गावत कडक लाॅक डाऊन सुरु असताना दिवसभर भूगांवमधील श्री सेवा मेडिकलमध्ये औषधापेक्षा इतर वस्तू खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. अखेर तहसीलदार अभय चव्हाण यांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक कायदानुसार मेडिकल सील करण्याचा आदेश दिला. यानुसार कार्यशील पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शनिवारी रात्री मेडिकल सील केले.
याबाबत महावार्ताला अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले की, मुळशीत मेडिकलमध्ये औषध विक्रीच झाली पाहिजे. मात्र इतर वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसल्यास संबंधित मेडिकल दुकानावरही कारवाई करण्यात येईल.
Share