महाराष्ट्र
Trending

बावधनमधील गायरानाची जागा कोणाला मिळणार? निवडणुक आयोगाला की क्रीडांगणाला

आमदार थोपटेंच्या प्रयत्नांना यश येणारच ः निलेश दगडे

महावार्ता न्यूज ः बावधनमधील नियोजित प्रांत कार्यालया शेजारील जागा ही केंद्रिय निवडणुक आयोगाला देण्यात आल्याने कागदावर तरी बावधन ग्रामस्थांनी केलेल्या क्रीडागणांच्या मागणी अडचणीत सापडली होती. याबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी वेळीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक घेऊन बावधन ग्रामस्थांचा क्रीडांगण मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा यशस्वी पाऊल टाकले आहे.
मार्चमध्ये आमदार संग्राम थोपटे हे बावधनमधील सर्व्ह नं. 23 मधील 21 एकर गायरानातील नियोजीत प्रांत कार्यालयाची पहाणीला आले असताना बावधन ग्रामस्थांनी क्रीडांगणाची मागणी केली. याबाबत गावातील शिष्टमंडळा सोबत दुसर्‍याच दिवशी महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात यांचीही भेट घेण्यात आली होती, नामदार थोरात यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्यासोबतही बैठक झाली होती. या बैठकीत क्रीडागणांला जागा देण्यााबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हिरवा कंदिल दाखविला होता. आमदार थोपटे यांनी सलग तीन दिवस मॅरथॉन पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धावपळ केली होती.
क्रीडागणांसाठी महिला बाल विकास महसूल खात्याकडे असणारी 1 हेक्टर 25 गुंठे जागा देण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र मे महिन्यात ही जागा नियोजनानुसार निवडुणक आयोगाला राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशाने देण्यात आली. यामुळे कागदावर तरी क्रीडांगणासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती. याबाबत आमदार थोपटे यांनी तातडीने बैठकीसाठी पाठपुरावा केला.

बावधन बुद्रुक गावच्या क्रीडांगणासाठी देण्यात आलेल्या निवेदनाच्या अमंलबजावणीच्या पुढील कार्यवाही करीता महत्त्वाची संयुक्त बैठक मंञालय मुंबई येथे पार पडली या बैठकीत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अमित देशमुख यांच्या आदेशाने भोरचे आमदार संग्राम थोपटे याच्या मार्गदर्शनाखाली मुख्य सचिव नितीन करीर ,अपर जिल्हाधिकारी विजय देशमुख,उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यामध्ये दिलेल्या निवेदनाची अंमलबजावणी काय कार्यवाही करता येईल याविषयावर चर्चा झाली.

मुंबईतील बैठकीत बावधन गायरानमधील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या नावावर असणारी 2 हेक्टर 42 गुंठे जागेतील 1 हेक्टर जागा निवडणुक आयोगाला देण्याबाबत विचार करण्यात आला. राजा दिनकर केळकर संग्रहालयाला जागा देऊन 18 वर्षे झाली तरी अजून त्यांनी जागेचा उपयोग केला नाही याबाबतही नामदार देशमुख यांनी सवाल उपस्थित केला. या संग्रहालयासाठी देण्यात येणार अनुदानही रद्द करण्याची शिफारस देशमुख यांनी केली आहे. तसेच संग्रहालयासाठी आता 3 पेक्षा अधिक एफएसआय उपलब्ध होत असल्याने त्यांना 6 एकर जागेची गरज नाही असेही देखमुख यांनी स्पष्ट केले.
याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संग्राहालय, निवडणुक आयोगाची इमारत व क्रीडांगणा अशी उर्वरीत जागेचा नवा आराखडा तयार करण्याबाबत आदेश दिले आहे. यामुळे आमदार थोपटे यांच्या प्रयत्नांना यश आले आहेत.

कार्यकुशल आमदार संग्रामदादा थोपटे यांच्यामुळे बावधन ग्रामस्थांच्या क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. संग्रहालय व निवडणुक आयोगाच्या इमारती सोडून उर्वरित जागेवर क्रीडांगण होईल अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. याबाबत थोरात आणि थोपटे या दोघांचे मी मुळशीकरांच्यावतीने आभार मानीत आहे
निलेश दगडे, मा. सरपंच – बावधन

 

बावधनमधील क्रीडांगणकरीता जिल्हाधिकार्यांकडून हिरवा कंदिल

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close