
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ,भोर विधानसभा युवक काँग्रेस , वेल्हा तालुका युवक काँग्रेसच्या मध्यामातुन कापडी मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
भोर , वेल्हा मुळशीचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली, विंझर, मालवली, दापोडे गावात वेल्हा तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष, उपसरपंच गणेश जागडे यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी भोर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव , वेल्हा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर , मुळशी तालुका सोशल मिडिया काँग्रेसचे अध्यक्ष अमित जांभुळकर , युवा नेते संतोष लिम्हण , संभाजी खुटवड ग्रा.प.सदस्य निगडे , संतोष खुटवड , संभाजी भोसले माजी सरपंच , विझंर चे सरपंच विनायक लिम्हण , उपसरपंच राहुल सागर , डाँ. उमेश गायकवाड अमोल गायकवाड उपस्थित होते
येणाऱ्या काळात युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण मतदारसंघात संघात मास्क व सॅनिटायझर वाटप उपक्रम राबणार आहे. यामुळे वेल्हा सारख्या दुर्गम भागत कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असे गणेश जागडे यांनी सांगितले
Share