ताज्या बातम्या
Trending
मुळशीतील पेरिविंकलच्या शाळेच्या विद्यार्थ्याचे अमिताभ बच्चनकडून कौतुक
संस्थापक राजेंद्र बांदल यांच्याकडून लक्ष्मीकांतचे अभिनंदन

महावार्ता न्यूज: पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूलच्या बावधनमधील लक्ष्मीकांत पांचाळ हा इयत्ता 5 वीतील विद्यार्थ्याने स्वहस्ते अमिताभ बच्चनचे हूबूहूब स्केच काढून ट्विटर वर पाठवले असता त्याला अमिताभजींनी स्वतः ते स्केट्च बघून ट्विटर वर लाइक करून पाठवून कौतुक केले आहे.
लक्ष्मीकांत हा केवळ 11 वर्षाचा विद्यार्थी येवढे हुबेहूब स्केच बनवतो याचा खरच पेरिविंकल स्कूलसाठी गौरवाची बाब आहे. त्याचा हा गुण वाखाणुन रिपोर्ट डे ला या विद्यार्थ्याला एक्सेप्शनल कामगिरीचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होतेच परंतु आता अमिताभजींच्या ट्विटरच्या लाइक मुळे दुधात साखर मिसल्याचा मान पटकावला.
अभ्यासक्रमाला दुजोरा देत इतर सुप्त कलागुणाना देखील वाव देण्यासाठी पेरिविंकल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल तसेच संचालिका सौ रेखा बांदल हे कायमच तत्पर आसतात.
लक्ष्मीकांत ची ही कला खरोखरच वाखाणया जोगी आहे. यात त्याचे पालक व तसेच कला शिक्षक नीता पवार यांचे खूप मोठे योगदान आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे विभागप्रमुख निर्मल पंडित व रुचिरा खानविलकर यांनी देखील त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
Share