ताज्या बातम्या
Trending

मुळशी धरणातील ४०० कुटूंबियांना शिवसेनेकडून अन्न-धान्य किट वाटप

महावार्ता न्यूज: मुळशी तालुक्यातील धरणग्रस्त भागातील आदीवासी, कातकरी,धनगर वाड्या वस्त्यावर जाऊन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  एक हात मदतीचा  या भावनेतून शिवसेना युवासेना मुळशी तालुक्याच्या वतीने ४०० अन्न-धान्य किट चे वाटप करण्यात आले
आंबवणे, पेठशहापुर, देवघर, जांबुळने, गेळदाड, माझगाव , बार्पे तिसकरी, तैलबैला, भांबर्डे, ऐकोले, आडगाव, आसनवाडी, घुटके,घनगड,मापारी बार्पे आडगाव,वांद्रे गोठेवस्ती,वांद्रे(भोरकस),वडुस्ते, निवे,ताम्हिणी,डोंगरवाडी,दावडी या गावांमध्ये शिवसेना युवासेना मुळशी तालुक्याच्या वतीने युवासेना पुणे जिल्हा युवाअधिकारी अविनाश बलकवडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि दिव्यांग संस्थेचे शहा आणि भागवत यांच्या माध्यमातून ४०० अन्न-धान्य किट चे वाटप पहिल्या टप्प्यात करण्यात आले. सदरच्या किटच्या माध्यमातून महिनाभर पुरेल एवढे राशन आणि मुबलक प्रमाणात कांदे बटाटे गरीब, गरजू आणि मागास समाजातील लोकांना देण्यात आले. कोरोनाच्या भयानक परीस्थितीमुळे लोकांच्या केवळ आरोग्याच्याच समस्या उभ्या राहिल्या नसून अनेकांना नोकरी, रोजगार देखील गमवावे लागले आहेत, परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून एक हात मदतीचा या भावनेतून युवासेनेच्या प्रयत्नातून आज या किटचे वाटप गावोगावी वाड्यावस्तीनवर जाऊन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा युवा अधिकारी अविनाश बलकवडे, शिवसेना तालुका समनव्यक हनुमंत सुर्वे, तालुका अधिकारी संतोष तोंडे, मा. युवासेना कार्याध्यक्ष राम गवारे, प्रसिद्धीप्रमुख वसंत बोडके, उपतालुकाप्रमुख अनिल अधवडे, सरपंच श्रीराम वायकर, योगेश बामगुडे, युवासेना उपतालुकाधिकारी दत्ता पठारे,विभागप्रमुख दत्ता गोरे, शिवाजी बलकवडे, दिलीप तिडके, रमेश पडवळ, शंकर जांभुळकर,नरेश हुंडारे, उपविभाग अधिकारी गजानन हिरवे, किसन सोनार,अनंता खेडेकर,शिवाजी शिळीमकर, प्रकाश सोनार यांनी केले.
यावेळी आंबवणे गावचे सरपंच मछिंद्र कराळे,उपसरपंच गोरख मेहता, भाऊ गोरे,आबा दिघे, शंकर कालेकर, प्रकाश मानकर, यशवंत सुतार,एकनाथ जांभूळकर,नथू सोनार,अर्जुनमामा पठारे,अर्जुन सोनार,विष्णू ढोरे ,पांडुरंग दुडे, अनिल शिंदे, पप्पु भिंताडे, राजू शिंदे,राजू बामगुडे पोलीस पाटील गणेश मेणे आणि गुरुदास मेणे.आणि मुळशी तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक,युवासैनिक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close