महाराष्ट्र
Trending
कोव्हिड रूग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर ऑडिट कामात भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भरीव योगदान
लवळे येथील इंजिनिअरींग काॅलेजचे प्राध्यापक झाले कोरोना योद्धा

महावार्ता न्यूज: मुळशी, सासवड तालुक्यातील २० कोविड हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जावून प्राणवायू वितरण व व्यवस्थापन ऑडिटचे काम लवळे येथील भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयच्या प्राध्यापकांनीकरून कोव्हिड विरोधी लढ्यात योगदान दिले आहे. मुळशीतील या कोरोना योद्धे इंजिनीअरिंग काॅलेजचे प्राध्यापकांचे कौतुक केले जात आहे.
कोवीड १९ च्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायूची कमतरता भासत होती. यासाठी प्राणवायूचा प्रभावी वापर व व्यवस्थापन करणे, कोविड हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज लक्षात घेऊन तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ व जिल्हाधिकारी, पुणे यांनी सीओईपीचे संचालक डॉ बी बी आहुजा यांचे मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मदतीने प्राणवायू वितरण व व्यवस्थापन ऑडिट करण्याच्या कामात योगदान देण्याचे आवाहन केले होते.
त्यास प्रतिसाद देत सामजीक बांधीलकी म्हणून या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय लवळेचे प्राचार्य डॉ. आर. एन.पाटील व विभाग प्रमुख एस आर पाटील, यु एस पाटील यांनी प्राध्यापकांना प्रोत्साहित केले.
प्रा. श्री अविनाश दातारकर, प्रा. श्री निलेश सिंग, प्रा. श्री सुभाष नागवसे आणि प्रा. श्री टी एस हसरमनी यांनी मुळशी व सासवडमधील कोविड हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जावून प्राणवायू वितरण व व्यवस्थापन ऑडिटचे काम वेळेत पूर्ण केले. या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Share