महाराष्ट्र
Trending
वाळेण दुर्घटनाग्रस्त कुटुंबियाच्या केवळ 4 लाखांची मदत, मुख्यमंत्री निधीबाबत आमदार थोपटेंची नाराजी

महावार्ता न्यूज: वाळेण, ता.मुळशी येथे नदीत बुडून पती-पत्नी व ३ मुली असा ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केवळ 4 लाखांची मदत दिल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
21 फेब्रुवारी 2021 रोजी घडलेल्या घटनेने मुळशी तालुक्यासह पुणे जिल्हादेखील हळहळला होता. या परिवारातील इतर सदस्यांची आमदार संग्राम थोपटे व तहसिलदार अभय चव्हाण यांनी सांत्वन भेट घेतली होती. यानंतर आमदार थोपटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रत्येकी 5 लाख एकूण 20 लाख बाधित कुटुंब सदस्यांना मिळावी अशी मागणी केली होती. प्रत्यक्षात प्रत्येकी 4 लाख दिल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली.
याबाबत महावार्ताशी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, याच मतदार संघात भोर मधील बाधितांना 4 लाख रूपयांचे सहाय्य मुख्यमंत्री निधीतून झाले होते. समान मदत मुख्यमंत्री महोदयांनी केली पाहिजे होती. याबाबत राज्याचे मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे सचिव यांनाही वाढीव मदतीसाठी कळवले आहे. वाळेण दुर्घटना ग्रस्तांना 20 लाख देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शंकर लायगुडे यांच्यासह त्यांची पत्नी व ३ मुली अपघातात मयत झाले. त्यांचा भाऊ व वडील हे दोघेही अपंग असल्याने दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर या परिवारावर या घटनेने पडलेला आहे. शंकर यांना एकुण 6 मुली व 2 पत्नी होत्या. पैकी 1 पत्नी व 3 मुली मयत झाल्याने उर्वरीत परिवारातील ३ मुलींना ही शासकीय मदत देण्यात आली. या परिवाराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे या परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 4 लाख देण्यात आले आहेत.
दशरथ लायगुडे (वय67 वर्षे), जयश्री शंकर लायगुडे (वय 10 वर्षे, अपर्णा अशोक माहांती (वय 17 वर्षे) अंकीता शंकर लायगुडे (वय14 वर्षे) या 4 कायदेशीर वारसांस प्रत्येकी एक लाख याप्रमाणे एकूण चार लाख बॅंकतून परस्पर वर्ग करण्यात आले आहेत.
शासकीय अटी व शर्तीनुसार कु. जयश्री शंकर लायगुडे., कु अपर्णा अशोक माहांती व कु. अंकीता शंकर लायगुडे पा तिन्ही मंजूर अर्थसहाय्य रु. 1.00,000 (रुपये एक लाख फक्त) प्रत्येकी त्यांच्या नावे मुदत ठेव स्वरुपात गुंतविण्यात येतील तिनही मुली सज्ञान झाल्यानंतर मुदत ठेवीवरील जमलेल्या व्याजासह संपूर्ण रक्कम त्यांना सुपूर्द करण्यात येईल.
Share