ताज्या बातम्या
Trending

मुळशी अग्नी दुर्घटनेतील एक अंत्यविधी झाला मध्यरात्री पुण्यात, शुक्रवारी मुळशीतील मृतांना देणार अखेरचा निरोप

महावार्ता न्यूज ः मुळशीतील उरावडेमधील केमिकल कंपनीत होरपळून मृत्यू झालेल्या 17 जणांचा डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर शितल खोपकर यांचा पहिला अंत्यविधी पुण्यात कोथरूड येथे रात्री 2  वाजता झाला. मुळशीतील उरावडे, पिरंगुट, खारावडे, पिरंगुट, भालगुडी गावातील मृतांना शुक्रवारी  अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
ससून रूग्णालयाकडून गुरूवारी रात्री आठ वाजता सर्व मृतांना नातलगांना अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यास कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस आणि जिल्हाधिकारी प्रशासनात समन्वय नसल्याने अनेक नातलगांनी शुक्रवारी मृददेह नेण्याचा निर्णय घेतला
एसंव्हीएस अँक्वा टेक्नॉलॉजी केमिकल कंपनीत सोमवारी लागलेल्या भीषण
आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला. आगीमुळे या कामगारांची ओळख
करणे अशक्य झाले होते. त्यामुळे डीएनए चाचणी करून, ते मृतदेह नातेवाइकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डीएनए चाचणीसाठी मृतांच्या नातेवाइकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. गुरुवारी
डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर
मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्याची सूचना नातलगांना देण्यात आल्या.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close