महाराष्ट्र
Trending

मुळशी अग्नी दुर्घटनेतील आठ मृतदेहांवर पुण्यात अंत्यसंस्कार, अजित पवारांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात

मुळशीतल्या कंपन्यांचे फायर ऑडिट करा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

महावार्ता न्यूज ः मुळशीतील उरवडे गावातील एसव्हीएस कंपनी मध्ये झालेल्या आग दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या सतरा नागरिकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांनी ससून हॉस्पिटलमधुन ताब्यात घेतले असून या सतरा पैकी आठ मृतदेहांवरती पुणे येथील वैकुंठ स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्योत आलेले आहेत तर उर्वरित नऊ मृतदेह हे सोलापूर येथे तीन,अहमदनगर येथेदोन,उस्मानाबाद येथे एक,तुळजापूर येथे एक,संगमनेर येथेे एक तर वैराग येथे एक हे त्या त्या गावातील त्यांचे नातेवाईक घेऊन गेले आहेत

मुळशी अग्नी दुर्घटनेतील एक अंत्यविधी झाला मध्यरात्री पुण्यात, शुक्रवारी मुळशीतील मृतांना देणार अखेरचा निरोप

अजित पवारांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात

 एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये मालकाच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाला. एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी कंपनीकडून मृतांच्या कुटुंबीयांना मोबदला देण्यात यावा, असं म्हणत चार मागण्या केल्या आहेत. प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसांना २५ लाख रुपये द्यावेत, मुलांच्या शिक्षणाची आजीवन जबाबदारी स्वीकारावी, प्रत्येक मृत व्यक्तीच्या घरातील एका व्यक्तीस कायमस्वरूप नोकरी देण्यात यावी, तसेच नियमांचं उल्लंघन करून कंपनीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं, अशा मागण्या नातेवाईकांनी केल्या आहेत. मुख्य चार मागण्यांवर अजित पवार यांनी तातडीने आदेश काढण्याचे आश्वासन दिल्याने ससून रुग्णालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेत नातेवाईकांनी हेसर्व मृतदेह ताब्यात घेतले

बाधितांच्या कुटुंबाला २५ लक्ष कंपनी मालकाने द्यावे, तालुक्यात अग्निशमन केंद्र त्वरित सुरू व्हावे 

 उरवडे, ता.मुळशी येथील कंपनीच्या दुर्घटनेबद्दल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. तालुक्यातील सर्व औद्योगिक कारखान्यांचे फायर ऑडीट करावे, तसेच कामगारांच्या सुरक्षेबाबत तसेच विम्याबाबत सर्व खबरदारी कारखान्यांनी घ्यावी. मुळशीमध्ये स्वतंत्र अग्निशमन दल व्हावे. तसेच या दुर्घटनेत मृत झालेल्या १७ जनांच्या कुटुंबातील सर्व वारसदारांना प्रत्येकी २५ लक्ष रूपये कंपनी मालकाने द्यावे. अशा मागण्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.            याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची तात्काळ दखल घेत सोमवारी जागेची मोजणी करण्यास संबधित अधिकारी यांना सांगितले आहे. तसेच कामगार आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून कामगार विषयी कामाचे आदेश दिले आहेत.

अग्नीतांडवातील मृत्यूमुखी  – 1) सचीन मदन घोडके वय 24 वर्ष खुडावाडे ता.तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद, 2) मंदा भाउसाहेब कुलट वय 49 वर्षे सध्या उरवडे ता.मुळशी जिल्हा पुणे, मुळ राहणार वलंन 3) सुरेखा मनोहर तुपे वय 45 वर्षे रा. करमोळी ता.मुळशी जिल्हा पुणे, 4) अर्चना व्यंकट कवडे वय 36 वर्षे  दुधी पो. मुळेगाव , ता.दक्षीण सोलापूर, जिल्हा सोलापूर, 5) महादेवी संजय आंबरे वय 40 वर्षे मुूळ राहणार संघादारी पो.मोरमणी जिल्हा सोलापूर , 6) मंगल बबन मरगळे वय 29 वर्षे राहणार खारावडे ता.मुळशी जिल्हा पुणे, 7) सुनिता राहुल साठे वय 28 वर्षे राहणार भालगुडी कोळवण रोड पोस्ट काशिग ता.मुळशी जिल्हा पुणे , 8) त्रिषला संभाजी जाधव वय 32 वर्षे राहणार उरवडे ता.मुळशी जिल्हा पुणे, 9) संगीता मारूती उर्फ आप्पा पोळेकर वय 43 वर्षे राहणार आर्यवत सोसायटी जवळ घेाटावडे फाटा ता.मुळशी जिल्हा पुणे,10) शितल दत्तात्रय खोपकर वय 43 वर्षे मु.पो.उरवडे ता.मुळशी जिल्हा पुणे, 11) गिता भरत दिवाडकर वय 41 वर्शे राहणार कांजणेनगर उरवडे ता.मुळशी जिल्हा पुणे, 12) सारीका चंद्रकांत कुदळे वय 42 वर्षे राहणार पवळेआळी पिरंगुट ता.मुळशी जिल्हा पुणे, 13) सिमा सचिन बो-हाडे वय 34 वर्षे राहणार उरवडे ता.मुळशी जिल्हा पुणे, 14) धनश्री राजाराम शेलार वय 22 वर्षे राहणार पिरंगुट ता.मुळशी जिल्हा पुणे, 15) संगीता उल्हास गोंदे वय 43 राहणार उरवडे ता मुळशी जिल्हा पुणे, 16) अतुल लक्ष्मण साठे वय 23 राहणार भालगुडी कोळवण रोड राममंदीरजवळ ता मुळशी जिल्हा पुणे, 17) सुमन संजय ढेबे वय 38 राहणार धनगर वस्ती लवासारोड खारवडे ता मुळशी जिल्हा पुणे

 

सुन्न करणारा अनुभव

मुळशी अग्नी दुर्घटनेतील पहिला अत्यंविधी मध्यरात्री 2 वाजता पुण्यात होताना..

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close