क्राइम
Trending
मुळशी अग्नी दुर्घटना ः व्यवस्थापक गौरव शहालाही आरोपी करणार, निकुंज शहाच्या कोठडीत होणार वाढ

महावार्ता न्यूज ः मुळशीतील उरवडे गावातील एसव्हीएस अॅक्का कंपनीमध्ये झालेल्या आग दुर्घटनेतील गुन्हात कंपनीचा व्यवस्थापक गौरव शहालाही सह आरोपी केले जाणार आहे. रविवारी 13 जूनला मुख्य आरोपी निकुंज शहाची 5 दिवसांची पोलिस कोठडी संपत असून त्याच्या कोठडीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
एसव्हीएस अॅक्का कंपनी सोमवारी 17 जणांचा होरपळून बळी गेला होता. या गुन्हातील मुख्य आरोपी निकुंज शहावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुणे ग्रामिण पोलिस तपास करीत आहे. विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील गुन्हाचा कसून तपास करीत असून रविवारी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याबाबत त्या न्यायालयाला मागणी करतील. गुन्हाची गंभिरता पहाता 5 ते 7 दिवसांची अजून पोलिस कोठडी आरोपी निकुंज शहाला मिळण्याची शक्यता आहे. रविवार 13 जून रोजी आरोपी निकुंज शहा दुसर्यांदा शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.
svs केमिकल कंपनीचे कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०४(२), २८५, २८६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली गेली आहे. आता सहआरोपी म्हणून एसव्हीएस अॅक्का कंपनीचा व्यवस्थापक गौरव शहालाही अटक होणार आहे. एसव्हीएस अॅक्का कंपनीचे दैनंदिन कामकाज, सुरक्षितता याबाबत सर्व माहिती ही गौरव शहाकडेच होती. मालक निकुंज शहा रोज कंपनीत येत नसे. निकुंज शहा यांच्े नातगल गौरव शहावर एसव्हीएस अॅक्का कंपनीची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. घटना घडली त्या दिवशी गौरव शहा कंपनीत हजर नव्हता. पोलिसांकडे गौरव शहाविरूध्द सबळ पुरावा हाती आल्याने त्याला येेत्या दोन दिवसांत अटक केली जाण्याची शक्यता आहे
मुळशी अग्नीतांडव घडले कसे? कोण जबाबदार
मुळशीत अपुरी सुरक्षितता, सॅनिटायझरमुळेच अग्नी तांडव
Svs केमिकल कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा
*व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा*
👇👇👇👇👇👇👇👇
Share