क्राइम
Trending

मुळशी अग्नी दुर्घटना ः कंपनी मालक निकुंज शहाच्या पोलिस कोठडीत 2 दिवसाची वाढ, व्यवस्थापक गौरव शहाला कधी होणार अटक

कंपनीत ऑक्टोंबर 2017 मध्ये यापूर्वी आगीची घटना , परवानगी शिवाय ज्वालाग्राही पदार्थाचा साठा मोठ्या प्रकाणात करण्यात

महावार्ता न्यूज ः मुळशीतील उरवडे गावातील एसव्हीएस अ‍ॅक्का कंपनीमध्ये झालेल्या आग दुर्घटनेतील गुन्हातील कंपनीचा मालक निकुंज शहाच्या पोलिस कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
गुन्हा गंभिर स्वरूपाचा असून त्याची व्याप्ती मोठी आहे. अटक केलेली व्यक्ती तपासात सहकार्य करत नाही. त्या कंपनीत ऑक्टोंबर 2017 मध्ये यापूर्वी आगीची घटना घडली होती. त्यामध्ये कंपनीची एक खोली जळाली होती. यातून कोणताही बोध न घेता दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने दिलेल्या परवानगी शिवाय ज्वालाग्राही पदार्थाचा साठा मोठ्या प्रकाणात करण्यात आलेला होता. याबाबत तपास करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्योती लक्का यांनी केली. 7 दिवसांची अजून पोलिस कोठडी मागण्यात आली होती. न्यायालयाने दोन दिवस दिले आहेत.
svs केमिकल कंपनीचे कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा  यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०४(२), २८५, २८६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली गेली आहे. एसव्हीएस अ‍ॅक्का कंपनी सोमवारी 17 जणांचा होरपळून बळी गेला होता.

व्यवस्थापक गौरव शहाला कधी होणार अटक

 सहआरोपी म्हणून एसव्हीएस अ‍ॅक्का कंपनीचा व्यवस्थापक गौरव शहालाही अटक करावी अशी मागणी दुर्घटनेतील मृतांचे नातलग करीत आहे. एसव्हीएस अ‍ॅक्का कंपनीचे दैनंदिन कामकाज, सुरक्षितता याबाबत सर्व माहिती ही गौरव शहाकडेच होती. मालक निकुंज शहा रोज कंपनीत येत नसे. निकुंज शहा यांचा नातलग गौरव शहावर एसव्हीएस अ‍ॅक्का कंपनीची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. घटना घडली त्या दिवशी गौरव शहा कंपनीत हजर नव्हता. पोलिसांकडे गौरव शहाविरूध्द सबळ पुरावा हाती आल्याने त्याला येेत्या दोन दिवसांत अटक होण्याची शक्यता आहे.

—————————————————————————————————————————————————–

आई मला खेळण्यासाठी कॅरम आणणार होती….. पण ती आलीच नाही…

हृदय पिळवटून टाकणाऱ्या या शब्दांनी एका क्षणार्धात संपूर्ण वातावरण सुन्न केले. ऊरवडे येथील अग्नितांडवाध्ये मृत्यू पावलेल्या कै मंगल बबन मरगळे यांच्या तेजस आणि दर्शन मरगळे या दोन्ही मुले सहा दिवसांनंतरही आईची वाट पहात आहे. मुळशीतील खारावडे येथील धनगर वाड्यातील संजय दुधाणे यांचा हा रिपोर्ट

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे 👇👇👇👇👇क्लिक करा

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close