ताज्या बातम्या
Trending
मुळशीतील लवळे होणार शंभर टक्के ‘ लसीकरण गाव
फ्लेम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कोरोनामुक्तीचा प्रयास

महावार्ता न्यूज: लवळे गावाचे शंभर टक्के लसीकरण करणार असून त्यासाठी कोविशिल्ड लस मोफत उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक बांधिलकी
जोपासण्यासाठी फ्लेम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून हे लसीकरण जास्तीत जास्त लवकर पूर्ण करणार असून ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. सध्यातरी कोरानाला हरविण्यासाठी लसीकरणाला कोणताही पर्याय नसल्याने नागरिकांनी तातडीने आणि स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घ्यावे. ” असे आवाहन
ऑक्सफर्ड गोल्फचे अध्यक्ष अनिरुद्ध शेवलेकर यांनी केले.
लवळे (ता.मुळशी) येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने फ्लेम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून लवळे गावातील शंभर टक्के ग्रामस्थांचे लसीकरण करण्याची
मोहीम हाती घेतली आहे. आज केवळ एकाच दिवशी तब्बल पाचशे ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. निशा नाथा राऊत हिला लस टोचून आजच्या लसिकरणाचा शुभारंभ येथील फ्लेम युनिव्हर्सिटीच्या सभागृहात करण्यात आला.
त्यानिमित्त शेवलेकर बोलत होते. गेल्या सुमारे पाच महिन्यांत गावातील केवळ सातशे नागरिकांनी लसीकरण करून घेतले असून त्यातील सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांच्या लसीकरण केंद्रापर्यंतच्या प्रवासासाठी ग्रामपंचायतीने व्यवस्था केली होती. त्यानंतर आज केवळ एकाच दिवशी तब्बल पाचशे ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. गाव शंभर टक्के लसिकऱणयुक्त होईल त्या दिवशापर्यंत ही लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार
असल्याचे फ्लेम युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार वीरेंद्र शर्मा यांनी सांगितले.
आजच्या लसीकरणाच्या शुभारंभावेळी उद्योजक नाथाजी राऊत , हरिश शहा , सरपंच नीलेश गावडे , उपसरपंच रंजित राऊत , गोल्फचे प्रतिनिधी कौशल व्होरा , माजी सरंपच संजय सातव , अजित चांदिलकर , विठ्ठल साकोरे , गणेश गावडे , दत्ता मोरे , आरोग्य सेवक
चंद्रकांत शेकडे , पोपट कळमकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच नीलेश गावडे यांनी सांगितले की , गावची लोकसंख्या ६७७६ असून आजपासून अठरा वर्षांवरील सर्व ग्रामस्थांचे फ्लेमच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. आज अखेर सुमारे चाळीस टक्के लसीकरण पूर्ण होत आले असून उर्वरित साठ टक्के
लसीकरण लवकरच पूर्ण करून गाव शंभर टक्के लसदार करणार आहोत. पुणे येथील सह्या्द्री हॅास्पीटलमधील डॅा. गिरिजा नावडीकर , डॅा. रश्मी भट , ज्योस्ली ज्योस ,
मनिषा भोवर , कोमल गायकवाड व प्रिया पवार यांच्या पथकाने लसीकरणासाठी सहकार्य केले. माजी सरंपच संजय सातव यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच रंजित राऊत यांनी आभार मानले.
Share