क्राइम
Trending

मुळशीत उच्चभ्रू सोसायटीला आग, तेरा जण बचावले

महावार्ता न्यूज : मुळशीतील हिंजवडी  गावातील अशोक मिडोज सोसायटीत आगीची दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या जावनांनी तत्परता दाखविल्याने तेरा जणांची सुखरूप सुटका झाली.
शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास टप्पा
क्रमांक एक मधील हिंजवडी -माण रस्त्यावर असलेल्या अशोक मिडोज रहिवाशी प्रकल्पातील एका इमारती मध्ये अचानक आग लागली.
चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर धुराचे प्रचंड लोट पसरल्याने एकच खळबळ उडाली, जवळच असलेल्या अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लिफ्ट जवळील मोकळ्या भागात असलेल्या विद्युत केबल्सला अचानक आग लागल्याने परिसरात धूर आणि आगीचे यावेळी धुरामुळे घाबरलेल्या परिस्थितीत तेरा नागरिक आतमध्ये अडकल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.
आग आणि धुराचे लोट पसरल्याने रहिवाशी घाबरले होते. चौथा आणि पाचवा मजला धुराने वेढला होता. मात्र, अडकलेल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
पीएमआरडीए आणि फेज तीनमधील
अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी पोहचल्या होत्या. मजल्यावरील रहिवाशांनी छतावर जाऊन बाजूच्या इमारती मधून खाली आले. मोठी दुर्घटना टळली असे अग्निशमन अधिकारीरामदास चोरगे यांनी सांगितले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close