क्राइम
Trending
मुळशीत पर्यटनावर बंदी, ताम्हिणी, लवासा, मुळशी धरण मार्गावर नाकाबंदी
पौड पोलिसांकडून 50 जणांवर कारवाई, 25 हजारांचा दंड वसूल

महावार्ता न्यूज: कोरोना (कोव्हीड -१९) प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन मुळशीत पर्यटनावर बंदीचा आदेश लागू झाला असून ताम्हिणी, लवासा, मुळशी धरण मार्गावरील पर्यटकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शनिवारी पौड पोलिसांकडून 50 जणांवर कारवाई करीत 25 हजारांचा दंड वसूल केला आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना (कोव्हीड -१९) विषाणुचा वाढता संसर्ग पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना
क्र.०५चे आदेशान्वये मुळशी तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील पुणे- कोलाड या मार्गावर
ताम्हीणी हे पर्यटनस्थळ असल्याने शनिवार व रविवार या दिवसांमध्ये चांदणी चौक (पुणे) ते ताम्हीणी घाटापर्यंत अनेक पर्यटक आणि त्यांचे वाहनांची (चारचाकी व दुचाकी) गर्दी होत असल्याने पर्यटकास मुळशी तालुक्यातील ताम्हीणी घाटामध्ये फिरण्यास या आदेशान्वये प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आली असून आदेशाचे उल्लंघन करणा-या पर्यटकावर पोलीस
निरीक्षक पौड यांनी नियमानुसार दंडात्मक व गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पुणे जिल्ह्याधिकार्यांना दिले आहेत.
शासकीय आदेशनुसार पौड, मुठा घाट व घोटावडे फाटा येथे पौड पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. मुळशीत पर्यटनास आल्यास कडक कारवाईचे संकेत पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिले आहेत.
शासकीय आदेश
Share