महाराष्ट्र
Trending
मुळशी तालुका संजय गांधी निराधार समितीवर अशोक मातेरे, बंडू मेंगडे, ज्ञानेश्वर केमसे यांच्यासह 9 सदस्यांची निवड

महावार्ता न्यूज: अखेर मुळशी तालुका संजय गांधी निराधार समितीसाठी तब्बल 2 वर्षांनी मुहूर्त सापडला असून आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
12 सदस्यांची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
1. अध्यक्ष- आमदार संग्राम थोपटे
2. विशाल खिलारी, नांदगाव
3.सौ. रेखा शिंदे, रिहे
4. ज्ञानेश्वर केमसे, कासारसाई
5. अशोक बलकवडे, दारवली
6. बंडू मेंगडे, शिळेश्वर
7.मधुकर दुर्गे, होतले
8. ज्ञानेश्वर डफळ, काशिग
9. अशोक मातेरे, घोटावडे
10.मोहन झुंजुरके, आंदगाव
11. गटविकास अधिकारी – संदिप जठार
12. तहसीलदार- अभय चव्हाण
मुळशी तालुक्याची संजय गांधी निराधार कमिटी गठित झाली असून त्यामधे महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे, आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या या कमिटीची लवकरच बैठक होणार असून त्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार आहेत. तसेच या योजनेअंतर्गत असणारी उत्पन्न मर्यादेची अट एक लाखापर्यंत करण्याची विनंती आमदार थोपटे यांच्याकडे केली असुन येत्या अधिवेशनात आपण राज्य शासनाङकङे सदर मागणी करण्याचे अश्वासन त्यांनी दिले आहे….!
– गंगाराम मातेरे ( अध्यक्ष: मुळशी तालुका कॉग्रेस कमिटी)
Share