पुणे
Trending
मुुळशी अग्नीतांडव : भालगुडीतील पिडीत लेकरांचा शिक्षणाचा सर्व खर्च कर्तव्य फाऊंडेशन करणार

महावार्ता न्यूज: मुळशीतील उरवडे येथील अग्नितांडवमध्ये भालगुडी येथील पिडीत साठे कुटुंबाच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून दोन कुटुंबातील लहानग्या मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च कर्तव्य फाऊंडेशनकडून केला जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे कर्तव्य परिवार घेत असलेले सामाजिक कार्यक्रमा अंतर्गत यावर्षी या पण सामाजिक जाणीव , आपलेपणाची भावना, प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी थोडसं काहीतरी करावे या हेतुने प्रेरीत होऊन महाविद्यालयीन काळापासून ते आज पर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा मुळशीच्या अग्नीतांडवातील भालगुडी येथील पिडीत साठे कुटुंबाच्या मदतीसाठी दोन कुटुंबातील मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च कर्तव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात रोख स्वरूपाचीची मदत करण्यात आली आहे. या प्रसंगी कर्तव्य फाऊंडेशनचे तुषार आमराळे, हनुमंत चोंधेपाटील, महेश दगडे, राहुल चोंधेपाटील, जितेंद्र इंगवले पाटील, धनंजय धोबे, सागर सुतार, अविनाश सुतार, विक्रांत जाधव, ओंकार तेली, आदित्य सुतार, अमित मोहोळ, सागर शिंदे, सचिनभाऊ सुभाषशेठ अमराळे, शशांक अमराळे, प्रदीप गावडे,डॉ विक्रम धुमाळ, राजू खरूसे, प्रफुल्ल धायगावे, नाना वाळके, दिपक दगडे पाटिल हे उपस्थित होते.
Share