खेळ खेळाडूमहाराष्ट्र
Trending

पुण्यात ऑलिम्पिक पदक पूजनाने होणार ऑलिम्पिक डे साजरा

23 जून रोजी ऑलिम्पिक दिन का साजरा होतो - संजय दुधाणे

पुणे ः देशासाठी खाशाबा जाधव यांनी जिंकलेले पहिले वैयक्तिक व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या संघाने जिंकलेल्या स्वातंत्र्यपपूर्व काळातील ऑलिम्पिक पदकाचे पूजन व ऑलिम्पिकपटूंचा गौरव करून पुण्यात बुधवारी 23 जून हा ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात येणार आहे.धु्रवतारा फाऊंडेशन व आर्चर्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात हा कार्यक्रम होणार आहे.
पुण्यातील बाबूराव सणस स्टेडियममधदील क्रीडा गॅलरीच्या नियोजित क्रीडा संग्राहलयात ऑलिम्पिकपटूंचा गौरव करून व ऑलिम्पिक पदकाचे पूजन करून सकाळी 11 वाजता ऑलिम्पिक दिन साजरा केला जाईल. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पुणे मनपा क्रीडा समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर यांच्या हस्ते ऑलिम्पिकपटू पै. मारूती आडकर,मनोज पिंगळे, पॅरालिम्पिकपटू सुयश जाधव यांचा ऑलिम्पिकवरील पुस्तके व स्मृतिचन्ह देऊन गौरव केला जाईल. याप्रसंगी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पै. राहूल आवारे, खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव, अजीत निमल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहे. कार्यक्रमास माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी सभामृह नेते धिरज घाटे, धु्रवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे व भारताचे आर्चरी प्रशिक्षक प्रा. रणजीत चामले उपस्थित रहाणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. ऑलिम्पिक दिनाचे महत्त्व या विषयावर स. प. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. रणजीत चामले तर भारताची ऑलिम्पिक यशोगाथा या विषयावर लेखक संजय दुधाणे व्याख्याने देतील. कार्यक्रमाच्या अखेरीस टोकिओ ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्सा मराठमोळ्या खेळाडूंना पुणेकराच्या वतीने स्वाक्षरीव्दारे शुभेच्छा व्यक्त केला जाणार आहेत.

23 जून रोजी ऑलिम्पिक दिन का साजरा होतो

– संजय दुधाणे, ऑलिम्पिक पत्रकार, लेखक

पॅरीसमध्ये ऑलिम्पिक अभ्यासक बॅरिन कुबर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी जागतिक ऑलिम्पिक संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. हाच दिवस आता जगभर ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. ऑलिम्पिकची मूल्य सर्वसामान्यांपर्यंत जावी यासाठी हा दिवशी ऑलिम्पिक डे रन म्हणजेच ऑलिम्पिक दौड आयोजित केली जाते. 
वय, लिंगभेद विसरून खेळाडू नसलेल्या मानव समाजाला खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे ऑलिम्पिक दिनाचे ध्येय आहे. 23 जून 1987 पासून ऑलिम्पिक दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. सुरूवातीला 45 देशात ऑलिम्पिक दिनानिमित्त ऑलिम्पिक दौड आयोजित केली जायची. आता 205 देशात ऑलिम्पिक डे रन होते. भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या वतीने देशातील सर्वच राज्यात ऑलिम्पिक दौडीत हजारो जण धावत असतात.
जागतिक ऑलिम्पिक संघटना म्हणजेच आयओसीने ऑलिम्पिक दिन कसा साजरा करावे याची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यानुसारच देशोदेशीच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना व राज्य ऑलिम्पिक संघटना हा दिवस मोठ्या दिमाख्यात साजरा करतात.
ऑलिम्पिक दिनानिमित्त आयओसीने 17 ते 24 जून हा कालावधी ऑलिम्पिक सप्ताह म्हणून जाहिर केला आहे. या दरम्यान ऑलिम्पिक डे रन, ऑलिम्पिक प्रदर्शन, ऑलिम्पिक परिसंवाद, ऑलिम्पिकपटूंशी भेट असे विविध क्रीडामय कार्यक्रम ऑलिम्पिक सप्ताहात जगभर आयोजित होतात.

 

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close